छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष गाड्या धावणार आहेत. विशेष गाडी क्रमांक 01260 नागपूर येथून 04 डिसेंबर रोजी सायंकाळी 06:15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10:55 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूर येथून 04 डिसेंबर रोजी रात्री 11:55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 03:05 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01264 नागपुर येथून 5 डिसेंबर रोजी सकाळी 08:00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री 11:45 वाजता पोहोचेल.
advertisement
विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी 06:15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10:55 वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापुर, भुसावल, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबा राहील. तर, विशेष गाडी क्रमांक 01249 मुंबई सीएसएमटी येथून 6 डिसेंबर रोजी रात्री 08:50 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11:20 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01253 दादर येथून 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:40 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी 04:10 वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक 01251 मुंबई येथून 7 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12:55 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01255 मुंबई येथून 7 डिसेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 03:00 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01257 मुंबई येथून 8 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी 04:10 वाजता पोहोचेल. दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी येथे गाडीला थांबा राहील.
अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाडी क्रमांक 01218 अमरावती येथून 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 05:45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 05:45 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01217 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:40 वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी दुपारी 12:50 वाजता पोहोचेल.
