मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी नवी डोकेदुखी
नव्या नियमानुसार सुरक्षारक्षकांकडून बॅगेज स्कॅनरद्वारे तपासणी झाल्याशिवाय टर्मिनसमध्ये प्रवेश दिला जात नाही. विमानतळावर जशी प्रक्रिया असते त्याच प्रमाणे तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या बॅगवर विशेष स्टिकर लावण्यात येत आहे. यामुळे तपासणी झालेली शिवाय न झालेली बॅग ओळखणे अधिक सोपे होणार आहे. तसेच क्लॉक रूममध्ये जमा करण्यात येणाऱ्या सर्व सामानाचीही काटेकोर तपासणी केली जात आहे.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते प्रवाशांकडे वैध तिकीट असणे जितके आवश्यक आहे तितकेच त्यांच्या सोबत असलेल्या सामानाची तपासणी करणेही महत्त्वाचे आहे. बॅगमध्ये कपड्यांव्यतिरिक्त कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू नेली जात नाही ना याची खात्री करणे सुरक्षेसाठी गरजेचे आहे. या उपाययोजनांमुळे रेल्वे परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत.
रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर दोन बॅगेज स्कॅनर बसवले आहेत. यासोबतच लोकल प्लॅटफॉर्म, तिकीट काउंटर तसेच एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता बॅगची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार असून एकूणच सीएसएमटीतील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली होणार आहे.
