TRENDING:

मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! पुणे, मुंबईतून धावणार विशेष रेल्वे, कधी आणि कुठे? पाहा वेळापत्रक

Last Updated:

Diwali Special Train: दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त मध्य रेल्वे विशेष रेल्वे चालवणार आहे. मुंबई आणि पुण्यातून या गाड्या सुटणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 ऑक्टोबर 2025 पासून विविध मार्गांवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे उत्तर भारत व इतर राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! पुणे, मुंबईतून धावणार विशेष रेल्वे, कधी आणि कुठे? पाहा वेळापत्रक
मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! पुणे, मुंबईतून धावणार विशेष रेल्वे, कधी आणि कुठे? पाहा वेळापत्रक
advertisement

मुंबई विभागातून धावणाऱ्या गाड्या

01031 सीएसएमटी–वाराणसी विशेष: सकाळी 07:35 वाजता सुटणार. थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी.

01047 सीएसएमटी–दानापूर विशेष: दुपारी 15:00 वाजता सुटणार. थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा.

advertisement

01079 सीएसएमटी–गोरखपूर विशेष: रात्री 22:30 वाजता सुटणार. थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, ओरई, कानपूर, लखनऊ, गोंडा, बस्ती, खलीलाबाद.

01143 एलटीटी–दानापूर विशेष: सकाळी 10:30 वाजता सुटणार. थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा.

advertisement

01051 एलटीटी–बनारस विशेष: दुपारी 12:15 वाजता सुटणार. थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, सुबेदारगंज, मिर्झापूर, वाराणसी.

Indian Railway : मोठी बातमी! नांदेड-हडपसर विशेष ट्रेन; जाणून घ्या थांबे अन् कोणत्या वेळेत धावणार?

पुणे विभागातून सुरू होणाऱ्या गाड्या

01415 पुणे–गोरखपूर विशेष: सकाळी 06:05 ला. थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर, लखनऊ, गोंडा, बस्ती.

advertisement

01449 पुणे–दानापूर विशेष: दुपारी 15:30 ला. थांबे: दौंड कॉर्ड लाईन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा.

01453 हडपसर–गाझीपूर सिटी विशेष: दुपारी 16:00 ला. थांबे: दौंड कॉर्ड लाईन, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज, वाराणसी, जौनपूर, औंरीहार.

नागपूरहून सुटणारी 01207 नागपूर–समस्तीपूर विशेष सकाळी 10:40 वाजता निघेल. थांबे: बेतूल, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर, ऐशबाग, गोंडा, बस्ती, गोरखपूर, छपरा, हाजीपूर, मुजफ्फरपूर.

advertisement

अमरावती–पुणे विशेष (01404) दुपारी 12:00 वाजता सुटणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

सर्व गाड्यांचे आरक्षण www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू असून, थांब्यांवरील वेळांसाठी NTES ॲप किंवा www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! पुणे, मुंबईतून धावणार विशेष रेल्वे, कधी आणि कुठे? पाहा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल