मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात तिकीट तपासकांनी एकूण 12 लाख 82 हजार विनातिकीट प्रवाश्यांना पकडले आहे, या प्रकरणांतून 55 कोटी 13 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष तपास पथके, अचानक तपासणी आणि गर्दीच्या वेळेत वाढवलेली देखरेख यामुळे ही कारवाई प्रभावी ठरल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात नऊ महिन्यांच्या कालावधीत आठ लाख 72 हजार फुकट्या प्रवाशांकडून 41 कोटी 26 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य आणि पश्चिम रेल्वेने वसूल केलेल्या दंडामध्ये सर्वाधिक दंड हा मध्य रेल्वेचाच होता.
advertisement
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, नियमित तपासणीमुळे केवळ महसूल वाढलेला नाही, तर वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हितही जपले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील टीसी ॲक्टिव्ह मोडवर आलेले दिसत आहेत. एआयचा वापर करत काही प्रवाशांनी तिकिट काढून काही प्रवाशांनी प्रवास केला होता. अशांवर कारवाई करत त्यांच्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांना रेल्वेने बनावट तिकिट ओळखण्याचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. सर्वाधिक फुकटे प्रवासी मध्य रेल्वेवर आढळून आल्याने पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना विनातिकिट प्रवास न करण्याचे आवाहन केले जात आहे.
