विश्वास, प्रेम आणि अखेर फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2023 पासून 27 जानेवारी 2025 या कालावधीत आरोपीने पीडित महिलेशी सातत्याने संपर्क ठेवला. तिच्या विश्वासावर बसत आरोपी तिच्या राहत्या घरी तसेच नवी मुंबईतील विविध ठिकाणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवत होता. या दरम्यान आरोपीने अनेक वेळा लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र नंतर आरोपीचे हे आश्वासन खोटे असल्याचे समोर आले. लग्न करण्याचा कोणताही हेतू नसताना आरोपीने महिलेला भावनिकरित्या गुंतवून तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिलेला मानसिक, भावनिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला असे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
advertisement
या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण अधिक तपास करत आहेत. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
