पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्याच जिवावर उठला
नेरूळ परिसरात राहणारा हा तरुण एका कुरिअर कंपनीत काम करत होता. शनिवारी रात्री कंपनीचे 50 हजार रुपये घेऊन तो घरी जात असल्याचे त्याने सांगितले. जुईनगर परिसरातील एका ठिकाणी सहा जणांनी आपल्याला अडवून गळ्यावर वार केला आणि रोकड लुटली, असा त्याचा आरोप होता. या प्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
पोलिसांची दिशाभूल करण्याचा भयंकर प्रयत्न
पोलिसांनी गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे कोणतेही वाहन किंवा संशयास्पद व्यक्ती कॅमेऱ्यात आढळून आल्या नाहीत.
यामुळे पोलिसांना संशय बळावला. सोमवारी सकाळी पोलिसांनी तक्रारदाराची सखोल चौकशी केली. अखेर त्याने स्वतःच हल्ल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. घरातील आर्थिक गरज भागवण्यासाठी कंपनीची रक्कम वापरण्याचा त्याचा विचार होता. त्यामुळे त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून लुटमारीचा बनाव रचला.
