10 रुपयांनी सुरू झाला खेळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता तुकाराम तांबे (वय 54)या केनस्टार कंपनीच्या इंडक्शन कुक पॉटमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. यावेळी त्या सायबर ठगांच्या जाळ्यात अडकल्या.
हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर काही वेळातच एका वेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. दुरुस्ती प्रक्रियेसाठी आधी रजिस्ट्रेशन आवश्यक असल्याचे सांगत त्याने केवळ 10 रुपये ऑनलाइन भरण्याची मागणी केली.
advertisement
खातं रिकामं कसं झालं?
महिलेचा विश्वास बसावा यासाठी आरोपीने तांत्रिक प्रक्रियेचे कारण सांगत मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन काही शब्द टाइप करण्यास तसेच काही पर्यायांना परवानगी देण्यास सांगितले. संशय येऊ नये म्हणून तो सतत फोनवर बोलत राहिला.
या दरम्यान आरोपीने महिलेच्या मोबाईलमध्ये बदल करून त्यांच्या बँक खात्यापर्यंत प्रवेश मिळवला. काही मिनिटांतच महिलेला बँकेकडून संदेश आला की त्यांच्या खात्यातून 98 हजार रुपये डेबिट झाले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
