TRENDING:

मुलगा अपघातात गेला, वडिलांनी ठरवलं! मागील 10 वर्षांमध्ये बुझवले 1500 खड्डे, एका बापाची कहाणी

Last Updated:

रस्त्याची योग्य वेळेस डागडुजी न झाल्यामुळे पावसाळ्यात आणि इतर दिवशी देखील रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात.
याच रस्त्यावरील खड्डे मोफत बुझवण्याचे कार्य मुंबईच्या दादाराव बिल्होरे यांनी हाती घेतले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : मुंबई शहर धावपळीच्या जीवनासाठी, रस्त्यांसाठी आणि ट्रॅफिकसाठी ओळखले जाते. मात्र मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या आहे हे आतापर्यंत आपल्याला माहितीच आहे. याच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वर्षाला हजारो पेक्षा जास्त वाहन चालकांचा आणि प्रवाशांचा जीव जातो. रस्त्याची योग्य वेळेस डागडुजी न झाल्यामुळे पावसाळ्यात आणि इतर दिवशी देखील रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात.
याच रस्त्यावरील खड्डे मोफत बुझवण्याचे कार्य मुंबईच्या दादाराव बिल्होरे यांनी हाती घेतले आहे.

advertisement

2015 साली दादाराव बिल्होरे यांचा 16 वर्षीय मुलगा प्रकाश बिल्होरे याने मुंबईमध्ये असलेल्या खड्ड्यांमुळे आपला जीव गमावला. 16 वर्षीय मुलगा ऐन तारुण्यात सोडून गेल्यामुळे दादाराव बिल्होरे यांनी मुंबईतील जेवढे शक्य होतील तेवढे सगळे खड्डे बुझवण्याचा निर्णय घेतला. गेल्या 10 वर्षांमध्ये 1500 पेक्षा जास्त खड्डे दादाराव बिल्होरे यांनी बुझवले आहेत.

दिव्यांगांसाठी ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, लगेच करा ऑनलाईन अर्ज, शेवटची तारीख काय?

advertisement

प्रकाश सारख्या अनेक तरुण मंडळींनी आणि वाहन चालकांनी फक्त रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आपला जीव गमावला असला तरी आजवर याकडे कोणी विशेष लक्ष वेधले नव्हते. मात्र दादाराव बिल्होरे यांच्या या कार्यामुळे सर्वजण त्यांचे कौतुक तर करतच आहे मात्र रस्त्याची योग्य देखभाल करण्याचे निर्णय अद्याप कोणी हाती घेतलेला नाहीये.

जोपर्यंत मला शक्य होईल तोपर्यंत मी रस्ते आणि रस्त्यातील खड्डे बुझवण्याचे कार्य करत राहील. माझ्या मुलासारख्या अनेक तरुणांचा जीव वाचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, असं दादाराव बिल्होरे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले. 

advertisement

आता दादाराव बिल्होरे यांना पॉटहोल ओळख जरी यांना मिळाली असली तरी सर्वजण शाबासकी आणि पुरस्कार देतात मात्र खऱ्या अर्थाने आर्थिक मदतची मदतीची गरज आहे ती कोणीही करत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. दादाराव बिल्होरे यांच्या या कार्यामुळे मुंबईतील अनेक अपघात टळले असे म्हणायला हरकत नाही.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुलगा अपघातात गेला, वडिलांनी ठरवलं! मागील 10 वर्षांमध्ये बुझवले 1500 खड्डे, एका बापाची कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल