दिव्यांगांसाठी ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, लगेच करा ऑनलाईन अर्ज, शेवटची तारीख काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Divyang Scheme: दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आता मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजना जाहीर करण्यात आलीये.
सोलापूर - दिव्यांगांना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे खास योजना जाहीर करण्यात आलीये. सोलापूर जिल्ह्यांतील दिव्यांगांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी दिव्यांगांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येतील, अशी माहिती सोलापूर जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे.
योजनेचा उद्देश काय?
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
कशी करायची नोंदणी?
गरजू दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज करता येणार आहे. अर्जदारांची नाव नोंदणी व अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
योजनेसाठी कागदपत्रे
दिव्यांगांसाठीच्या ‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’ या लाभासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंक पासबुक, पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, डोमिसाईल प्रमाणपत्र, रेशन अथवा मतदानकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड ही कागदपत्रे लागणार आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
January 28, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
दिव्यांगांसाठी ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, लगेच करा ऑनलाईन अर्ज, शेवटची तारीख काय?