अभिषेक आणि मॉरिस यांच्यात राजकीय वैर होतं. मॉरिस राजकारणात येण्यासाठी धडपडत होता. त्यातूनच अभिषेक घोसाळकर यांच्याशी सतत वादही व्हायचे. मॉरिस नेहमी फेसबुक लाइव्ह करायचा आणि यात तो घोसाळकर यांना डिवचायचा. लाइव्हमध्ये अनेकदा घोसाळकर यांचे नावही घ्यायचा. एक वर्षापूर्वी मॉरिसला एका प्रकरणात अटक झाली होती आणि तो तुरुंगात होता. त्याची जामिनावर सुटका झाली होती.
advertisement
मॉरिसने एका व्यक्तीला पैसे दिले होते. ते पैसे परत मिळाले नाही तेव्हा मॉरिसने त्याच्या पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. या प्रकरणात महिलेने अभिषेक यांची मदत घेत मॉरिसविरोधात तक्रार दिली होती. मॉरिस परदेशातून भारतात परतताच त्याला विमानतळावरून बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणी तो तुरुंगात होता. आपल्याला अटक करण्यासाठी अभिषेक घोसाळकरांनी दबाव टाकल्याचा समज मॉरिसला होता. त्यातूनच दोघांमध्ये टोकाचे वैर निर्माण झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
आयसी कॉलनीमध्ये सध्या प्रभाग एकमध्ये अभिषेक घोसाळकर यांची पत्नी नगरसेवक आहेत. यावेळी मॉरिस निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होता. याच राजकारणाच्या वादातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याशिवाय अभिषेकने आपल्याला गुन्ह्यात गोवल्याचं मॉरिसला वाटत असे. या रागातूनच अभिषेक घोसाळकर यांना संपवण्यासाठी मॉरिसने कट रचला असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
