अभिषेक घोसाळकर यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. यात ते गंभीर जखमी होऊन घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी तातडीने उचलून रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, घोसाळकर यांच्या छातीत डाव्या बाजुला आणि जांघेमध्ये गोळी लागली. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपासाला सुरुवात करण्यात आलीय.
advertisement
Abhishek Ghosalkar : आय किल्ड अभिषेक, वो अब...; घोसाळकरांवर गोळीबारानंतर बोलला मॉरिस
कोण आहे मॉरिस?
मॉरिसभाई नरोना स्वतःला एक समाजसेवक असल्याचं सांगत असे. कोरोना काळात तो जास्त चर्चेत आला. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळं त्यानं अनेकांना मदतीचा हात दिला. अनेकांना रेशन वाटल्याच्या बातम्या आहेत. काही काळापूर्वीच त्यांची ओळख झालेली मात्र त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरुन नेमका वाद झाला हे अस्पष्ट आहे.
मॉरिस भाईवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीसांरखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोपही मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने महिलेला धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.