Abhishek Ghosalkar : आय किल्ड अभिषेक, वो अब...; घोसाळकरांवर गोळीबारानंतर बोलला मॉरिस
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घातल्यानंतर मॉरिस त्याच्या कार्यालयाबाहेर आला. त्यानंतर हातातली रिव्हॉल्वर उंचावर आय किल्ड अभिषेक असं ओरडला.
मुंबई : दहिसरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. मॉरिस नरोना याच्यासोबतचे वाद मिटवून पुढे एकत्र काम करण्याचं ठरवल्याचं फेसबुक लाइव्हमध्येही अभिषेक घोसाळकर यांनी सांगितलं होतं. फेसबुक लाइव्ह संपवून बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी ते उठताच मॉरिस नरोनाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
मॉरिस नरोना हा मॉरिस भाई नावाने ओळखला जात होता. अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घातल्यानंतर मॉरिस त्याच्या कार्यालयाबाहेर आला. त्यानंतर हातातली रिव्हॉल्वर उंचावर आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नही जायेगा असं ओराडला. अभिषेक यांच्या लग्नाचा वाढदिवस १४ फेब्रुवारी रोजी होता. लग्नाचा वाढदिवस मनालीला साजरा करण्याचं नियोजन त्यांचं होतं. पण त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली.
advertisement
कार्यालयात गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून रिक्षातून रुग्णालयात नेलं. रुग्णालयात नेताना त्यांची कोणतीही हालचाल नव्हती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अभिषेकवर गोळीबारानंतर त्याचे समर्थक आणि लोकांनी गर्दी केली. तेव्हा जमाव पाहून मॉरिसने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असल्याची माहिती समजते.
गोळीबारात वापरण्यात आलेलं रिव्हॉल्वर हे अवैध असल्याची माहिती समोर आलीय. मॉरिसकडे शस्त्र परवानासुद्धा नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे रिव्हॉल्वर कुठून आली, त्याने कसं मिळवलं याचा तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 09, 2024 9:20 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Abhishek Ghosalkar : आय किल्ड अभिषेक, वो अब...; घोसाळकरांवर गोळीबारानंतर बोलला मॉरिस


