तुकाराम महाराजांना चारशे वर्षे होऊनही त्यांचे विचार समर्पक आणि मार्गदर्शक आहे. प्रसंगी कासेची लंगोटी देण्याची आणि नाठाळांच्या माथी काठी हाणण्याती ताकद होती. संत तुकाराम महाराजांशी आमचं वर्षानुवर्षाचं नातं आहे. पालखी बारामतीतून जाते,मुक्काम असतो, काठेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण करून स्वागत करतो असंही अजित पवार यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतर मला तुकाराम महाराज आठवले असं काहींनी म्हटलं असं म्हणत टीका करणाऱ्यांना अजित पवार यांनी उत्तर दिलं.
advertisement
तुकाराम महाराज आमच्या श्वासात , ध्यासात, विचारात आणि रक्तात आहेत. ते आठवावे लागत नाहीत. लोकसभा येतील जातील, कोणालाही चांगलं यश मिळालं तर आनंद होतोच. तुम्हाला मिळालं आनंद वाटणं स्वाभाविक आहे. तुकाराम महाराजांचे विचार आमच्यासोबत आहेत. इतर संतांच्या पालख्या आमच्या बारामतीतून जातात. त्यामुळे तुमच्या आरोपात तथ्य नाही असं अजित पवार म्हणाले.
जयंत पाटील यांनी सभागृहात विंदा करंदीकरांची कविता वाचून अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी विंदा करंदीकर यांचीच कविता सभागृहात वाचून दाखवली. एवढे लक्षात ठेवा ही कविता अजित पवार यांनी वाचली.
एवढं लक्षात ठेवा
उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥