advertisement

Maharashtra politics : उद्धव ठाकरेंनी टाकला नवा डाव, विधानसभेपूर्वीच भाजपला पडणार खिंडार? मोठी बातमी समोर

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा गट शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील  भाजपचा मोठा नाराज गट शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याची शक्यता आहे. नाराज गटामध्ये भाजपचे पदाधिकारी राजू शिंदे यांच्यासह सहा ते सात नगरसेवक आणि काही जिल्हा परिषद सदस्य देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. लोकसभेत भाजपने शिवसेनेचं काम केलं आणि संदीपन भुमरे निवडून आले. त्यानंतर संजय सिरसाट यांनी साधे आभार सुद्धा मानले नाहीत. मग आम्ही काय फक्त शिवसेनेचे काम करायचे? असा सवाल राजू शिंदे यांनी केला आहे. राजू शिंदे पश्चिम मतदार संघातून संजय सिरसाट यांच्या विरोधात उभे होते, त्यांना 40 हजार मते पडली होती. आता पुन्हा विधानसभा तिकीट मिळेल की नाही अशी शंका असल्याने राजू शिंदे आपला गट घेऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून, महाविकास आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. आता सर्वचं राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Maharashtra politics : उद्धव ठाकरेंनी टाकला नवा डाव, विधानसभेपूर्वीच भाजपला पडणार खिंडार? मोठी बातमी समोर
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement