त्यामुळे दादर‑प्रभादेवी, करी रोड, लोअर परेल, वरळी‑शिवडी मार्गयांचा वापर करणाऱ्या वाहनांमध्ये मुंबईकरांचा सर्वाधिक वेळ जात आहे १०-१५ मिनिटांच्या अंतरावर किमान ३५-४० मिनिटे वाहतूक कोंडी होते.
कोरड्यावाहू जमिनीत एकरी १८ क्विंटल कापसाचे होईल उत्पन्न, अकोला पॅटर्न सारखी करा शेती
वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग
करी रोड ब्रिज - परेल पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परेलकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा ब्रिज वापरला जात आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत तो 'वन वे' (एक दिशा) केला आहे. रात्री ११ नंतर सकाळी ७ वाजेपर्यंत दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते.
advertisement
टिळक ब्रीज दादर पूर्वेकडून दादर पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा ब्रिज वापरला जात आहे. चिंचपोकळी ब्रीज - परेल-भायखळा पूर्व, प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड आणि सी लिंकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.