या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मिरा भाईंदरमध्ये नवे बळ मिळाले आहे. इमरान हाशमींच्या नेतृत्वाखालील हा गट राष्ट्रवादी आणि भाजपच्या गडात खिंडार पाडणारा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नेत्यांना आपल्या गटात सामावून घेण्याच्या ठाकरे गटाच्या धोरणाला मोठे यश मिळाल्याची चर्चा स्थानीक राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार गटासाठी मोठा धक्का
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विकास राजकीय समीकरणांमध्ये आमुलाग्र बदल घडविणारा ठरू शकतो. मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार, महापौर, उपमहापौर व सर्वात जास्त नगरसेवक आणि बळकट संघटना होती. एकेकाळचा हा बालेकिल्ला असल्याने अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातो.
advertisement
मिरा भाईंदर आरक्षण सोडत
मिरा भाईंदर महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या 95 आहे. यापैकी महिलांसाठी 48 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी (एससी) 4 प्रभाग मध्ये चार जागा आरक्षित आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) 1 जागा एका प्रभागात आरक्षित आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी 25 प्रभागात जागा आरक्षित आहेत. सर्वसाधारण सदस्यांची संख्या 65 असून, त्यापैकी 33 महिलांसाठी राखीव आहेत.महापालिकेच्या प्रभाग निहाय जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये मीरारोड पूर्वेच्या प्रभाग 12 मधील दोन जागा खुल्या वर्गातील महिलांसाठी तर 1 जागा इत्तर मागासवर्ग साठी राखीव होऊन केवळ एकच जागा सर्वसाधारण गटात राहिली आहे.
