TRENDING:

'लोकच संभ्रम पसरवताय', निवडणूक आयोगाने मात्र मतदारांवरच फोडलं खापर, ठाकरेंनाही दिलं उत्तर

Last Updated:

आज सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत मार्कर पेनमुळे लावलेली शाई पुसली जाात आहे, असा मोठ्या प्रमाणात संभ्रम पसरवला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण पहिल्यांदाच असा अभुतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळत आहे. अनेक ठिकाणी मतदान केल्यानंतर शाई पुसली जात आहे. तर काही जणांना आपले मतदार केंद्रच सापडत नाही. या सगळ्या प्रकारावर निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेतली आणि "सगळ्या गोष्टींना निवडणूक आयोग जबाबदार नाही, काही जबाबदारी ही मतदारांची पण आहे, काही जबाबदारी ही राजकीय पक्षांची पण आहे. काही जबाबदारी ही उमेदवारांची पण आहे" असं म्हणत वाघमारेंनी सगळं खापर मतदारांवरच फोडलं.
News18
News18
advertisement

ऐन मतदानाच्या दिवशी सुरू असलेल्या गोंधळामुळे सगळीकडे एकच संतापाची लाट आहे. प्रसारमाध्यमांनी बातम्या लावून धरल्यानंतर  राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश  वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली.

आज सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत मार्कर पेनमुळे लावलेली शाई पुसली जाात आहे, असा मोठ्या प्रमाणात संभ्रम पसरवला जात आहे. माझं सांगने आहे ही एक इंटिबेल इंक आहे, भारत निवडणूक आयोग जी इंक वापरतो तीच इंक इंडरेबल इंक वापरत आहे, तीच इंक आहे, मात्र ती मार्कर पेनच्या स्वरुपात आहे. हे मार्कर पेन २०११ पासून वापरले जात आहे. यामध्ये ही शाई पुसली जात नाही, विशेष करून एकदा लावल्यानंतर १२ ते १५ सेकंदात शाई ड्राय होते. मतदार हा तोपर्यंत मतदान केंद्रातच असतो. या शाईविषयी कुठल्या प्रकारचा संशय आणि व्हिडीओ बाहेर काढले जात आहे. हा संभ्रम पसरवला जात आहे, असा दावाच वाघमारेंनी केला.

advertisement

"कोरस कंपनीचे मार्क वापरतोय. २०११ पासून मार्कर वापरले जात आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणूक ही १० वर्षांनंतर होत आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीत काय पद्धत आहे. अनेक ठिकाणी ४ वार्डमधून उमेदवार निवडून द्यायचे आहे. या मध्ये सुद्धा संभ्रम आहे. यासाठी आम्ही एक अॅनिमेशन व्हिडीओ तयार केला आहे. मतदारांना किती मत द्यायचं, कोणत्या मतप्रक्रियेचा कलर वेगळा आहे. काही मतदारांनी पाहिलं आहे त्यांचा गोंधळ उडाला आहे" असंही वाघमारे म्हणाले.

advertisement

'निवडणूक आयोगाला सॉफ्ट टार्गेट केलं जातंय'

निवडणूक आयोगाला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. सगळ्या गोष्टींना निवडणूक आयोग जबाबदार नाही, काही जबाबदारी ही मतदारांची पण आहे, काही जबाबदारी ही राजकीय पक्षांची पण आहे. काही जबाबदारी ही उमेदवारांची पण आहे, असं म्हणत वाघमारेंनी उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगावर कारवाई करण्याच्या विधानावर भाष्य केलं.

advertisement

मतदारांचीही जबाबदारी

"याद्या चेक करत असतानाही अनेक मतदारांचं नाव यादीत नव्हतं. मतदाराची यादी विधानसभेची आम्ही वार्ड नुसार स्प्लिट करत असतो. पोलीस स्टेशनच्या हद्दीनुसार बदलत असतो. प्रभागानुसार बदलली आहे. त्यामुळे मतदान केंद्र राहणारच नाही. लोक विधानसभेची यादी घेऊन जात आहे. आमचं एॅप आहे, पोर्टल आहे. मतदान केंद्रावर मतदाराचे नाव तपासणासाठी BLO बसलेले आहे, त्यांच्याकडून मतदार शोधत येतो. यात मतदाराची जबाबदारी आहे' असा दावाही वाघमारेंनी केला.

advertisement

'तर कारवाई करू'

"मतदान मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान प्रतिनिधी असतात त्याची ओळख पटवून देतात. ती ओळख पटवल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यांना मतदानाबद्दल काही आक्षेप असेल तर मतदान अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतो. एखादा मतदार जर पुन्हा मतदार करायला आला तर मतदान केंद्रावरील अधिकारी हे तपासतील जर आढळून आलं दुबार मतदार करण्यासाठी आला तर कारवाई केली जाईल" असंही त्यांनी स्पष्ट केलं.

EVM मध्ये 2 टक्के खराबी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि तुरीच्या दरात पुन्हा घट, कापसाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तसंच, "मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मतदारांचा टक्का चांगला आहे. मार्कर पेनचा अनुभव घेता, जिल्हा परिषद निवडणुकीला इंटेल इंक वापरणार आहोत. मतदानांचं प्रकार ३५ टक्के आहे. दोन टक्के ईव्हीएम खराब झाल्या आहेत .मागील १० वर्षांमध्ये एकही ईव्हीएम विकत घेतली नाही. त्याच त्या ईव्हीएम मशीन वापरत आहे. त्यामुळे २ टक्के ईव्हीएअ खराब होण्याच प्रमाण आहे, असंही वाघमारेंनी मान्य केलं.

मराठी बातम्या/मुंबई/
'लोकच संभ्रम पसरवताय', निवडणूक आयोगाने मात्र मतदारांवरच फोडलं खापर, ठाकरेंनाही दिलं उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल