TRENDING:

Shocking News : बापाचं संतापजनक कृत्य! चोरीच्या संशयावर पोटच्या पोराला गरम सुरीचे चटके; मुंबई हादरली

Last Updated:

Mumbai Shocking News : घरातील आणि शाळेतील पैसे चोरी केल्याच्या संशयावरून वडिलांनी आपल्या मुलांना गरम सुरीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगावमध्ये उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील तसेच शाळेतील शिक्षकांचे पैसे चोरी करत असल्याच्या संशयावरून एका वडिलांनी आपल्या लहान मुलांना अमानुष शिक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधित वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

चोरीच्या संशयातून मुलांना दिल्या असह्य यातना

10 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान ही घटना घडली असून गोवेले गवळआळी येथील आरोपीच्या राहत्या घरी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने घरातील सुरी गरम करून आपल्या दोन मुलांच्या हातांवर आणि पायांवर चटके दिल्याचे तपासात समोर आले आहे. जखमी मुले ही आरोपीची स्वतःचीच मुले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

मुलांनी घरातील पैसे तसेच शाळेतील शिक्षकांचे पैसे चोरी केल्याच्या तक्रारी येत असल्याने आरोपीने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मुलांच्या तक्रारीनंतर तसेच माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जखमी मुलांवर उपचार करण्यात येत असून पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : बापाचं संतापजनक कृत्य! चोरीच्या संशयावर पोटच्या पोराला गरम सुरीचे चटके; मुंबई हादरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल