TRENDING:

VIDEO : प्रेमासाठी वाट्टेल ते? मुलुंड स्थानकात तरुणीसाठी दोन तरुणांची हाणामारी; थेट रुळावर उतरून राडा; VIDEO व्हायरल

Last Updated:

Mulund Railway Station Viral Video : सोशल मीडियावर रेल्वे स्थानकात होत असलेल्या अनेक घटनांचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या अतिशय धक्कादायक व्हिडिओ मुलुंड रेल्वे स्थानकातील व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनची चर्चा तर जगभरात होत असते. त्यातही रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि धावपळ सर्वांनाच माहिती आहे. यातून अनेकदा प्रवाशांमध्ये वाद तर कधी हाणामारी होत असते. पण सध्या मुलुंड रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेने सर्वांच्या अंगावर काटा आणला आणला असून सध्या तो व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलुंडमध्ये तरुणीसाठी दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी
मुलुंडमध्ये तरुणीसाठी दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी
advertisement

नेमकी घटना काय?

मुंबई उपनगरातील मुलुंड रेल्वे स्थानक नेहमीच गर्दीने गजबलेले असते. दरम्यान प्लॅटफॉर्मवर उभे असताना तिथं दोन तरुणांमध्ये एका तरुणीवरुन बाचाबाची सुरु होते. या वादाचे रुपांतर इतके गंभीर होते की अन्य प्रवाशांना काही समजण्याच्या आत दोघांनी एकमेंकाना ट्रॅकवर ओढतात. यांना पाहून प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली, त्याचे वेळी ट्रॅकवर लोकल येण्याची शक्यता होती. त्यातही ते तरुण ट्रॅकवर एकमेंकाना मारहाण करत सुटले होते, ज्यामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

advertisement

प्रवाशांनी काय केले?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ तुम्ही पाहिला असता, तरुण जेव्हा ट्रॅकवर उतरले असता काही प्रवाशा ही त्यांना थांबवण्यासाठी तिथं उतरतात. नंतर दोघांचीही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघही कोणाचे ऐकण्यास तयार नव्हते. त्याच वेळी एका ट्रॅकवरुन लोकल येताना दिसताच खाली उतरलेल्या प्रवाशांनी तरुणांना धरुन प्लॅटफॉर्म आणले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

advertisement

View this post on Instagr

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील parivartan_news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ज्यात कॅप्शनमध्ये,''तरुणीसाठी दोन तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर भिडले '' असे लिहिण्यात आलेले असून त्यावरु हा व्हिडिओ मुलुंड स्थानकातील असल्याचे समजते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हे गाव लई न्यारं! ज्ञानोबा ते शिवबा, गावानं जपलाय ऐतिहासिक वारसा, तुम्ही पाहिलं का? Video
सर्व पहा

महत्त्वाचे म्हणजे आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहे, त्यातील एका यूजरने लिहिले,''लोकांनी दोघांना पण तुडवायला पाहिजे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले,''पोलिसांनी कारवाई करावी'' तर काहींनी म्हटलं की,''मोठी दुर्घटना होता होता वाचली'' अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
VIDEO : प्रेमासाठी वाट्टेल ते? मुलुंड स्थानकात तरुणीसाठी दोन तरुणांची हाणामारी; थेट रुळावर उतरून राडा; VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल