TRENDING:

गिफ्ट्सची अनोखी कल्पना ठरली सोन्याची खाण, असा होता धनश्री सावंतचा 40 लाखांच्या कमाईचा प्रवास

Last Updated:

मुंबईतील धनश्री सावंत हिने वयाच्या 26 व्या वर्षी तिने एक आगळावेगळा व्यवसाय सुरू करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. धनश्रीने अनेक वर्षे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम केले. मात्र नोकरीत मन न रमल्यामुळे तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजची तरुणाई नोकरीवरच न थांबता स्वतःच्या व्यवसायाकडेही मोठ्या उत्साहाने वळताना दिसते. अशीच एक तरुणी आहे मुंबईतील धनश्री सावंत. वयाच्या 26 व्या वर्षी तिने एक आगळावेगळा व्यवसाय सुरू करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. धनश्रीने अनेक वर्षे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम केले. मात्र नोकरीत मन न रमल्यामुळे तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement

सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून होणार सुरू, पहिलं उड्डाणही ठरलं?

त्यातूनच ‘माऊली सेलिब्रेशन्स’ या गिफ्टिंग कंपनीची सुरुवात झाली. साधारणपणे गिफ्ट घ्यायचे म्हटलं की ऑनलाईन मागवावी लागतात, पण वस्तू अपेक्षेप्रमाणे न मिळण्याचा धोका असतो. हे लक्षात घेऊन धनश्रीने ग्राहकांच्या पसंतीनुसार, त्यांच्या बजेटमध्ये गिफ्ट डिझाईन करून देण्याची सेवा सुरू केली. फक्त 75 रुपयांपासून ती गिफ्ट उपलब्ध करून देते आणि घरपोचही पोहोचवते. वाढदिवस, लग्न, खास प्रसंग, सण-वार किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या गिफ्टसुद्धा ती तयार करते.

advertisement

20 रुपयामध्ये पोटभर खा!सोलापुरी दालचा राईस,पिंपरी-चिंचवडमधील ठिकाण माहितीये का?

लॉकडाऊनच्या काळात धनश्रीच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिला वडिलांची साथ मिळाली. वडिलांचा किराणा व्यवसाय पाहत मोठं होताना ग्राहकांशी नातं कसं ठेवायचं, व्यवसाय कसा सांभाळायचा हे तिने शिकलेलं होतं. याच अनुभवाचा उपयोग करून तिने स्वतःचा व्यवसाय उभारला. फक्त दहा हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू झालेला हा व्यवसाय आज धनश्रीला दरवर्षी सुमारे 40 लाखांचे उत्पन्न देतो.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
गिफ्ट्सची अनोखी कल्पना ठरली सोन्याची खाण, असा होता धनश्री सावंतचा 40 लाखांच्या कमाईचा प्रवास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल