लोकमान्य टिळक टर्मिनस ते मनमानड गणपती विशेष रेल्वे 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. या गाडीचे आरक्षण 5 ऑगस्टला खुले होणार आहे. आता वाढलेल्या फेऱ्यांसह गणेशोत्सव काळात मध्ये रेल्वेवर विशेष फेऱ्यांची संख्या 302 पर्यंत पोहोचली आहे.
advertisement
कसं असेल वेळापत्रक?
लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव – एलटीटी साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्र. 01003/4) ही विशेष गाडी दर सोमवारी धावणार आहे. एलटीटीहून सोमवारी सकाळी 8.20 वाजता ही गाडी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता ती मडगावला पोहोचेल. तर मडगाव येथून दर रविवारी दुपारी 4.30 वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी एलटीटी येथे सकाळी 6 वाजता पोहोचेल.
थांबे कुठे?
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष रेल्वेला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या ठिकाणी थांबे असतील.
