मुंबई : श्रावण महिना सुरू झाल्यावर अनेक सण उत्सवांना सुरुवात होते. सण उत्सव म्हटल्यावर आरती, भजन, मंत्रोच्चार होतात. यामध्ये टाळ्या वाजताना घुंगरू कडीचा वापर केला जातो. हाताची टाळी वाजविताना घुंगरू आदळल्याने आपल्या वाहिन्या (नस) अजून जागृत होतात. टाळ्यांसोबत घुंगरांचा आवाज हा मन आणि वातावरण प्रसन्न करतो. त्यामुळे घुंगरू कडीचे विशेष महत्त्व सांगितले जाते. तर मग याच घुंगरू कडी मुंबईत एका ठिकाणी अगदी स्वस्त दरात मिळत आहेत.
advertisement
मुंबईतील विले पार्ले मार्केटमध्ये घुंगरू कडी फक्त 50 ते 100 रुपयांना मिळत आहे. यामधे उत्कृष्ट प्रतीचे घुंगरू वापरले गेले आहेत. याचबाबत लोकल18 चा आढावा.
नेहमीच आपण टाळ, घंटी, ढोलक असे साहित्य देवांची पूजा किंवा आरती करताना वापरतो. आता सध्या मार्केट मध्ये याच वाद्यांना अजून संगीतमय करण्यासाठी घुंगरू कडीही वापरली जाते. या घुंगरू कडीचे वैशिष्ट असे की, याला आपण अगदी सहजरीत्या अंगठी प्रमाणे आपल्या हातांच्या बोटांमध्ये घालू शकतो आणि पूजा किंवा आरती चालू असताना, ज्याप्रमाणे आपण टाळी वाजवितो त्याचाच सोबत ह्या घुंगरू काडीचा आवाज ही त्या तालासोबत घुमतो.
निसर्गाचा अद्भुत आविष्कार, साताऱ्यात पसरली पांढरी शुभ्र धुक्याची चादर, सुंदर अशी अनुभूती, VIDEO
ही कडी वजनाला अगदी हलकी असते. प्रत्येकी कडीमध्ये 3-5 घुंगरू असल्याने त्यांचा आवाज ही छान कर्कश घुमतो. या हलक्या वजनाची घुंगरू कडीची किंमत 50 रुपये आहे. यामध्येच थोडी जाडसर घुंगरू कडी 100 रुपयांना मिळते.
गाव असावं तर असं!, दारू पिणाऱ्या व्यक्तीस, दारू आणण्यासही बंदी; महाराष्ट्रातील एक आदर्श गाव, VIDEO
सध्या या घुंगरू कडीचे मार्केटमध्ये खूप ट्रेंड चालू आहे आणि हे मुंबईतील विले पार्ले येथील दीनानाथ मार्केटमध्ये अगदी बजेट फ्रेंडली दरात मिळते. त्यामुळे या सर्व सण उत्सवात तुम्ही याचा वापर करू शकता. घुंगरू कडीच्या खरेदीसाठी हे मार्केट तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.