निसर्गाचा अद्भुत आविष्कार, साताऱ्यात पसरली पांढरी शुभ्र धुक्‍याची चादर, सुंदर अशी अनुभूती, VIDEO

Last Updated:

सकाळी मॉर्निंग वॉकला आलेले अनेक सातारकर, त्याचबरोबर पर्यटकांना या सुंदर अशा दृश्याचे दर्शन होते. सध्या असेच अतिशय आल्हाददायी वातावरण, निळे आभाळ आणि त्यावर धुक्याची चादर, असे मोहित करणारे दृश्य पाहायला मिळत आहे.

+
पांढरी

पांढरी शुभ्र धुक्‍याची चादर

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्याला अत्यंत सुरेख अशी नैसर्गिक साधनसंपत्ती लाभली आहे. इथल्या कास रोडला यवतेश्वर घाटामध्ये तर पर्यटकांना जणू स्वर्गसुख अनुभवायला मिळते, असे म्हणतात. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार हा मुसळधार पाऊस झाल्यानंतर जेव्हा पाऊस उघडी देतो आणि सूर्य देवाचे दर्शन होते तेव्हा पाहायला मिळतो.
सकाळी मॉर्निंग वॉकला आलेले अनेक सातारकर, त्याचबरोबर पर्यटकांना या सुंदर अशा दृश्याचे दर्शन होते. सध्या असेच अतिशय आल्हाददायी वातावरण, निळे आभाळ आणि त्यावर धुक्याची चादर, असे मोहित करणारे दृश्य पाहायला मिळत आहे.
advertisement
मराठ्यांची राजधानी म्हणूनही साताऱ्याला संपूर्ण जगभरात ओळखले जाते. साताऱ्याला सप्ततारा म्हणूनही ओळखले जाते. याच सातारा शहरावर धुक्याची चादर पसरलेली आहे. मागील काही दिवसांत वातावरणात झालेला बदल, कधी पाऊस तर कधी वाढलेली थंडी यामुळेच पहाटे साताऱ्यावर पांढरी शुभ्र धुक्‍याची चादर पसलेली दिसते.
advertisement
त्यामुळे नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. साताऱ्यातील यवतेश्वर घाटामधून डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य पाहून सर्वांनाच स्वर्गात आलेल्यांची अनुभूती होत आहे. सकाळी येणारे ज्येष्ठ नागरिक, यांनी हे दृश्य पाहून आपल्या फोनमध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये आणि डोळ्यांमध्ये टिपले आहेत.
advertisement
वाटाण्याच्या शेतीतून सासवडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळी भागातही घेतलं लाखाचं उत्पन्न, VIDEO
हवामानाचा या लहरीपणामुळे आता आणखी काही दिवस नागरिकांना पाऊस आणि उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस सोसावा लागणार आहे. या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. खोकला, सर्दी व तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असे असले तरी, अनेक महिन्यांनी अनुभवायला मिळालेल्या धुक्‍याचा आनंद नागरिकांना आल्हाददायकच वाटत आहे.
advertisement
यंदा पावसाळ्यातही नागरिकांना उन्हाचा तडाखा सोसावा लागला होता. पण, आता दाट धुक्‍याची सकाळ उजाडू लागल्याने वेगळाच आनंद अनुभवता येत आहे. धुक्‍यात हरवलेले सातारा शहर त्याचबरोबर रस्ते, वृक्ष, डोंगर बघताना मनाला सुखद अनुभूती मिळत असून सातारपासून वरच्या भागात असणाऱ्या पर्यटन ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढताना पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
निसर्गाचा अद्भुत आविष्कार, साताऱ्यात पसरली पांढरी शुभ्र धुक्‍याची चादर, सुंदर अशी अनुभूती, VIDEO
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement