वाटाण्याच्या शेतीतून सासवडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळी भागातही घेतलं लाखाचं उत्पन्न, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
जिल्ह्यातील पुरंदर तालुका व सासवड, सिंगापूर हे पट्टे वाटाणा अर्थात मटारसाठी प्रसिद्ध आहेत.तर हा पट्टा दुष्काळ भाग म्हणून ही ओळखला जातो.सिंगापूरचे शेतकरी माऊली कोरडे यांचा अनेक वर्षांपासून या पिकात हातखंडा तयार झाला आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अनेक शेतकरी हे वर्षानुवर्षे एक पीक घेऊन त्यातून चांगले उत्पन्नही घेत आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका व सासवड, सिंगापूर हे पट्टे वाटाणासाठी प्रसिद्ध आहेत. हा पट्टा दुष्काळ भाग म्हणून ही ओळखला जातो. आज अशाच शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
सिंगापूरचे शेतकरी माऊली कोरडे यांचा अनेक वर्षांपासून या पिकात हातखंडा तयार झाला आहे. माऊली दरवर्षी दोन ते तीन एकरांत वाटाणा पीक घेतात. एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न ते यामधून घेत आहेत. पुणे, मुंबई सारख्या बाजारपेठात विक्री केली जाते.
पावसाच्या पाण्यावर तसेच दोन महिन्यांत येणारा व कमी खर्च असलेला वाटाणा पीक घेण्याकडे पुरंदर या भागातील शेतकऱ्यांचा कल आहे. मजुरांचा प्रश्न हा मोठा आहे. पुरंदर भागात अंजीरचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि कमी खर्चात कमी पाण्यातही तुम्ही वाटण्याचे पीक घेऊ शकता. पुरंदरच्या वाटण्याला एक वेगळी चव असते. मुंबई, पुण्याप्रमाणे सासवडच्या बाजारात ही चांगली मागणी मिळते. अवघ्या 2 महिन्यात हे पीक येते आणि यामधून चांगले भांडवलही मिळते. ते घेऊन तुम्ही इतर पिकासाठी ही ते वापरू शकता.
advertisement
ब्रेन ट्युमर होऊनही अभ्यास सुरू ठेवला, गावातली तरुणी KBC मध्ये जिंकली 50 लाख रुपये, अमिताभ बच्चन यांनी दिलं आणखी एक गिफ्ट
गेल्या अनेक वर्षांपासून माऊली वाटाणा पीक घेत आहेत. ते जवळपास 2 ते 3 एकरमध्ये वाटाणाची लागवड करतात. एकरी 1 लाखापर्यंत उत्पन्न ही मिळवतात. मात्र, हे पीक पावसावरचे आहे. शिवाय ते कमी कालावधीचे म्हणजे दोन महिन्यांत येणारे पीक आहे. या पिकानंतर ज्वारीची लागवड करायची असते. त्यासाठी रान लवकर मोकळे करून देणारे हे पीक आहे. यासोबत जर पाऊस चांगला झाला पाण्याची सोय असली तर वाटाणा काढणीनंतर ज्वारी, कांद्याचे पीकही घेतो, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
पावसाळ्यात शेळ्यांना हिरवा चारा देताना घ्या ही काळजी, अन्यथा जनावरांना बसेल मोठा फटका
तसेच पुढे ते म्हणाले की, दोन महिन्याच्या कालावधीत 3 ते 4 तोडे होतात. या वाटाण्याल एक वेगळी गोडी असल्यामुळे बाजारात चांगली मागणी मिळून भावदेखील चांगल्या प्रकारे मिळतो. आत्तापर्यंत 18 क्विंटल इतका माल निघाला आहे. त्याचे दर यंदा थोडे जास्त म्हणजे प्रति किलो 70 ते 100 रुपयांपर्यंत आहेत, अशी माहितीही शेतकरी माऊली कोरडे यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 26, 2024 12:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
वाटाण्याच्या शेतीतून सासवडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळी भागातही घेतलं लाखाचं उत्पन्न, VIDEO