पनवेल-कर्जत मार्गावर 2 किमी लांबीच्या वावर्ली बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे-कल्याण स्थानकातील गर्दी मोठ्या संख्येने कमी होणार आहे. या मार्गावरुन मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर मुंबई ते कर्जतदरम्यान पनवेलमार्गे लोकलदेखील सोडण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 56.82 हेक्टर खाजगी जमीन आणि 4.4 हेक्टर सरकारी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे, त्यामुळे लवकरच हे काम पूर्णत्वाकडे जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
advertisement
mega block time table: मुंबईकरांचे मेगाहाल करणार Mega block, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
पूर्णत्वास आलेली कामे
- जमिनीचे काम: 20 लाख घनमीटर मातीचा भराव करण्यात आला आहे.
- बोगदे: तिन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.
- पूल: 47 पुलांपैकी 35 (29 लहान आणि 6 मोठे) पूल पूर्ण झाले आहेत.
- रोड ओव्हर ब्रिज (ROBs): 4 ROB बांधण्यात आले आहेत आणि मोहोपे आणि किरवली सारख्या महत्वाच्या ठिकाणी काम वेगाने चालू आहे.
- पुणे एक्सप्रेस वे अंडरपास: त्याचे काम पूर्ण झाले आहे.
प्रगतीपथावर असणारी कामे
- पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत स्थानकांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
- प्लॅटफॉर्म, फूट ओव्हरब्रिज (FOB) आणि प्रशासकीय इमारती यांसारख्या सुविधांचे कामही प्रगतीपथावर आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील रायगड जिल्ह्याचे क्षेत्र कर्जतला जोडणे आणि एमएमआरचा विस्तार करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे पनवेल आणि कर्जत दरम्यानच्या नवीन कॉरिडॉरसह मुंबई लोकलला शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळेल. एकूण 5 स्थानके या कॉरिडॉरमध्ये असतील. नवीन कॉरिडॉरमध्ये पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असतील. डिसेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती, तर नवीन मुदत डिसेंबर 2025 ही ठेवण्यात आली आहे.