advertisement

Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....

Last Updated:

BJP Shiv Sena in KDMC : एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश दिला जात होता. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये नाराजी दिसून आली होती. आता, या महापालिकांमधील महायुतीबाबतही रविंद्र चव्हाण यांनी भाष्य केले.

पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... त्या ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... त्या ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची बैठक पार पाडली. गुरुवारी रात्री झालेल्या या बैठकीनंतर आज सकाळी रविंद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीत महायुती होणार असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात कुरघोडी सुरू असल्याचे चित्र होते. एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश दिला जात होता. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये नाराजी दिसून आली होती. आता, या महापालिकांमधील महायुतीबाबतही रविंद्र चव्हाण यांनी भाष्य केले.
नगर परिषदेच्या प्रचारांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने आल्याने महायुतीमध्ये तणाव असल्याची चर्चा सुरू होती. तर, भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जात होता. विशेषत: भाजप आणि शिवसेना शिंदे गटात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून तणाव निर्माण झाला होता. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महापालिकांमध्ये परस्पर पक्षातून इनकमिंग सुरू झाले होते. तर, पक्ष फोडाफोडी सुरू असताना शिंदे गट-भाजपच्या नेत्यांमध्ये वार प्रतिवार सुरू झाले. त्या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीत युतीची घोषणा करण्यात आली.
advertisement

ठाणे-कडोंमपाबाबत काय रविंद्र चव्हाणांनी काय म्हटले?

नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, युतीसाठी वरिष्ठ नेते आग्रही होते. मुंबई, ठाणे सारख्या महापालिकेत युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर युतीबाबत एक समिती तयार होईल, त्यात चर्चा होईल. स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. महायुतीमध्ये निवडणुका लढवण्यामध्ये वरिष्ठांमध्ये चर्चा झाली आहे. महायुतीमध्ये भाजपसोबत शिवसेना आणि स्थानिक पातळीवर इतर पक्षांसोबतही चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
advertisement
रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर एक समिती स्थापन करण्यात येईल. स्थानिक पातळीवरील महायुतीच्या अनुषंगाने चर्चा होईल. स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. राजकारणात कोणीही वैरी नसतो, कोण कधी मित्र होईल हे सांगता येत नाही असे सांगत महायुतीमध्ये मागील काही काळात झालेल्या वादावादी भाष्य केले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत महायुती होईल. स्थानिक पातळीवर चर्चेतून तोडगा न निघाल्यास वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement