मध्य रेल्वेने ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची योजना आखली आहे. लवकरच मध्य रेल्वे प्रशासनाकडून ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3 आणि 4 अशा तीन फलाटांची लांबी वाढवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. जेणेकरून तिथे 15 डब्ब्यांच्या लोकल थांबू शकतील. दिवसेंदिवस वाढत असलेली प्रवासी संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची 16.15 मीटर, प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चारची 40 मीटर इतकी रूंदी केली जाणार आहे. हे काम झाल्यानंतर 12 डब्ब्यांच्या ऐवजी 15 डब्ब्याच्या लोकल चालवल्या जाणार आहेत.
advertisement
ठाणे रेल्वे स्थानकावरून दिवसाला 5 लाख प्रवासी प्रवास करतात. या लाखो प्रवाशांना रेल्वे प्रशासन देत असलेल्या सुविधांमुळे गर्दी देखील कमी होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेने ठाणे स्थानकावरील या पायाभूत सुविधांची घोषणा केली होती. त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ते 10 ची रूंदी वाढवली होती. गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने मे 2024 मध्ये रेल्वेने स्थानकांची जवळपास 13 मीटरपर्यंत रूंदी वाढवली होती. प्लॅटफॉर्म 2, 3 आणि 4 या फलाटाच्या रूंदीकरणाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे. गर्दीमुळे लोकलमध्ये होणाऱ्या अपघातांमुळे रेल्वे प्रशासनाने हा फलाटांच्या रूंदी वाढवण्याचा आणि 15 डब्बे लोकल चालवण्याचा निर्णय घेतला.
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये लोकलमध्ये नोकरदार वर्गाची घरी जाण्यासाठी मोठी गर्दी असते. ट्रेनमध्ये चढण्यासाठी जागा सुद्धा नसते, त्यामुळे लोकलमधून खाली पडून अपघात होण्याची शक्यता असते. 15 डब्यांची लोकल सुरू झाल्यानंतर गर्दी विभागण्याची शक्यता आहे. तसंच, लोकलच डबे वाढल्याने गर्दीमुक्त प्रवास होण्याची शक्यता आहे. कर्जत, कसाराहून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे फायदेशीर आहे.
