उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक गौरव हमराह, हेड कॉन्स्टेबल प्रवीण कुमार आणि लेडी कॉन्स्टेबल पूजा गुप्ता हे प्रयागराज जंक्शनवर गस्तीवर होते. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर 3 अल्पवयीन मुले बॅगांसह दिसली. जीआरपी जवळ आल्याचं पाहून ते घाबरले आणि पुढे जाऊ लागले. वेगाने चालत कॉन्स्टेबल जवळ पोहोचले आणि त्यांनी प्रेमाने चौकशी केली. तेव्हा या मुलांनी सांगितलं, की ते मदरशातून पळून मुंबईला जात आहोत. आजकाल मुलांना OTT सीरिजमध्ये सहज काम मिळतं. असं आम्ही ऐकलं आहे. म्हणूनच आम्ही तिकडे जात आहोत, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
जीआरपीने केलेल्या चौकशीत मोहम्मद, मोहम्मद सुफियान आणि मोहम्मद इक्बाल अशी त्यांची नावं असल्याचं उघड झालं. हे तिघेही बिहार येथील रहिवासी आहेत. त्यांच्या बॅगेत कपडे, खारी बिस्किटे आणि पुस्तके सापडली. रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पोस्ट प्रयागराज कार्यालयात नेलं, जिथे मुलांना जेवण आणि पाणी देण्यात आलं आणि मुलांची माहिती रेल्वे चाइल्ड लाईन प्रयागराजच्या कार्यालयात देण्यात आली. यानंतर ज्योती सिंह आणि विमल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पोस्ट प्रयागराजमध्ये पोहोचले. घटनेची संपूर्ण माहिती देत तिन्ही मुलांचे फोटो काढल्यानंतर त्यांना त्यांच्या सामानासह सुखरूप ताब्यात देण्यात आलं.