गणिताच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिली अजब गोष्ट; शिक्षकासाठीचा तो पर्सनल मेसेज झाला तुफान व्हायरल
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे, त्यात त्याने आपल्या शिक्षकासाठी पर्सनल मेसेज लिहिला होता, पण तो व्हायरल झाला
नवी दिल्ली : शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. यात असे काही असतात ज्यांना अभ्यासात खूप रस आहे. काही सरासरी विद्यार्थी असतात, पण काही विद्यार्थी असेही असतात ज्यांचं मन अभ्यासात अजिबातही लागत नाही. ते वर्षभर वर्गात आपलं काहीच खास टॅलेंट दाखवत नाहीत पण त्यांची खरी प्रतिभा परीक्षेतील उत्तरपत्रिकेत दिसून येते. अशाच एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे, जी पूर्णपणे अनोखी आहे.
अनेक वेळा सोशल मीडियावर काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. सध्या अशाच एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे, त्यात त्याने आपल्या शिक्षकासाठी पर्सनल मेसेज लिहिला होता, पण तो व्हायरल झाला. इथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की शिक्षक हे उत्तर वाचून अजिबात रागवले किंवा चिडले नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं ते आश्चर्यकारक होतं.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, शिक्षक मुलाची कॉपी उघडत आहेत. या मुलाला मल्टी चॉईस प्रश्नांमध्ये 18 गुण मिळाले आहेत आणि इतर प्रश्नांमध्येही काही गुण जोडून त्याला एकूण 27 गुण मिळाले आहेत. संपूर्ण पेपर संपल्यावर मुलाने लिहिलेला संदेश म्हणजे शायरी अशी की - 'पढ़-पढ़ कर क्या करना है, एक दिन तो मरना है, फिर भी पास होने की इच्छा है'. कविता वाचून सर म्हणाले - बेटा, मी तुला पास केलं आहे.
advertisement

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर rakesh.sharma.sir नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. विद्यार्थ्यांच्या या कृतीवर लोकांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं- 'त्याने इंग्रजीतही कविता लिहिली आणि ती खोडली, नंतर हिंदीत लिहिली'. दुसऱ्या यूजरने लिहिलं - 'घे तू पण पास झाला'. याशिवाय लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2024 11:55 AM IST
मराठी बातम्या/Viral/
गणिताच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिली अजब गोष्ट; शिक्षकासाठीचा तो पर्सनल मेसेज झाला तुफान व्हायरल