मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही डोंबिवलीतील आयरे गावात एका घरात राहात होते. या ठिकाणी राहात असतानाच आरोपीने मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने धाडसाने विरोध करत स्वतःची सुटका केली आणि घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ डोंबिवली पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
आयरे गावातून आरोपीला घेतलं ताब्यात
advertisement
पोलिसांनी तत्परतेने आरोपीचा शोध घेत आयरे गावातून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांच्या तात्काळ कारवाईचे स्वागत केले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची ही घटना समाजातील स्त्रीसुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.