TRENDING:

Mumbai: घरात आग लागली, अग्निशमन दलाला करत होता मदत; पण अचानक हरीशंकर जमिनीवर कोसळला

Last Updated:

अग्निशामक दल आग विझवत असताना घराचे मालक हरीशंकर पालीवाल हे सुद्धा त्यांना मदत करत होते. पण..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई:  मुंबईतील भांडूपमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरात आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्यामुळे घर मालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भांडूप परिसरात ही घटना घडली आहे. हरीशंकर पालीवाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. भांडुप परिसरातील भट्टीपाडा परिसरात ही घटना घडली आहे. हरीशंकर पालीवाल हे भट्टीपाडा परिसरात एका खोलीत राहत होते. अचानक दुपारच्या सुमारास खोलीमध्ये आग लागली. त्यामुळे पालीवाल यांनी स्वतःच्या घराला आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

आगीची माहिती तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.अग्निशामक दल आग विझवत असताना घराचे मालक हरीशंकर पालीवाल हे सुद्धा त्यांना मदत करत होते.  पण आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक विजेच्या तारेचा स्पर्श झाला आणि पालीवाल यांना जबर विजेचा धक्का बसला.

advertisement

विजेचा धक्का बसल्यामुळे हरीशंकर पालीवाल हे घरातच कोसळले.  फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि पथकाने  पालीवाल यांना जवळच्या बडवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.  आपल्याच घरात आग विझवता मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 विरारमध्ये घरातील गॅस गळती होऊन स्फोट

दरम्यान, मुंबईजवळील विरार पश्चिमेकडील पद्मावती नगरातील गोल्डन ओक इमारतीत गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन जवान पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. गोल्डन ओक इमारतीच्या ए विंग 301 मध्ये हा स्पोट झाला असून यात आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळ्या तिळाची झाली भाव वाढ, आले आणि केळीचे गुरुवारी काय दर? Video
सर्व पहा

देवीना सुरेश पवार (वय 43) आणि सिद्धेश सुरेश पवार (वय 19) असं जखमी झाल्याची नावं आहेत. प्राथमिक उपचारासाठी जवळच्या संजीवनी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन, अग्निशमन जवान, आणि वैद्यकीय विभाग दाखल झाले आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: घरात आग लागली, अग्निशमन दलाला करत होता मदत; पण अचानक हरीशंकर जमिनीवर कोसळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल