मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून त्यावर उपाय म्हणून जलमार्गाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न होतोय. त्यासाठी यापूर्वीही वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागड्या तिकीट दरांमुळे या सेवांना मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक टॅक्सीची संकल्पना पुढे आलीये.
मुंबईत 2 तासाचा प्रवास 30 मिनिटांत, या 9 ठिकाणी होणार केबल कार
advertisement
भारतीय बनावटीची ई-टॅक्सी
दरम्यान, सुरुवातीला ही इ-टॅक्सी परदेशातून विकत घेण्याचा विचार ता. परंतु, माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (एमडीए) स्वत:च इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांची निर्मितीही यशस्वी पूर्ण केलीये. ‘एमडीएल’ने तयार केलेल्या दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची सेवा ते स्वत: पुरवणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
कशी आहे ई-वॉटर टॅक्सी?
ई-वॉटर टॅक्सीची लांबी 13.27 मीटर असून रुंदी 3.05 मीटर आहे. या टॅक्सीची आसन क्षमता 25 प्रवशांची आहे. यामध्ये 64 किलोवॅटची बॅटरी असून ती एकदा चार्जिंग केल्यावर 4 तास चालू शकते. तर टॅक्सीचा वेग 14 नॉट्सपर्यंत राहणार आहे. विशेष म्हणजे या ई-वॉटर टॅक्सीत वातानुकूलित सुविधा उपलब्ध असणार आहेत.