TRENDING:

Mumbai Crime: 12 रुपयांच्या सिगारेटवरून वाद झाला अन् तरुणाने वाहनचालकाला पेटवलं, मुंबईतील घटना

Last Updated:

जोगेश्वरी पश्चिम परिसरात सिगारेटच्या पैशावरून झालेल्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाने 44 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: जोगेश्वरी पश्चिम परिसरात सिगारेटच्या पैशावरून झालेल्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाने 44 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली आहे. 44 वर्षीय राजेंद्र जयराम यादव वाहन चालक असून ते या प्रकरणात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जोगेश्वरी पश्चिमेतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai Crime: मुंबईत किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला, तरुणाने थेट वाहन चालकालाच पेटवले; नेमकं कारण काय?
Mumbai Crime: मुंबईत किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला, तरुणाने थेट वाहन चालकालाच पेटवले; नेमकं कारण काय?
advertisement

राजेंद्र यादव यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवण्याचा गंभीर प्रकार 11 जानेवारी रोजी घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी 22 वर्षीय नागेंद्र यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (11 जानेवारी) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र यादव कामावरून घरी परतत होते. घराजवळच असलेल्या पानटपरीजवळ ते दुचाकी पार्क करत असताना, त्यांचा पुतण्या पंकज यादव याचे त्या पानटपरीवर नागेंद्र यादव याच्यासोबत सिगारेटच्या पैशावरून वाद सुरू होता. नागेंद्र यादव नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

advertisement

पंकज हा पानटपरी चालवतो. नागेंद्र नशेत असल्याचे पाहून राजेंद्र यादव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले. वाद वाढत असल्याचे पाहून राजेंद्र यादव यांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, नागेंद्र यादव आक्रमक झाला आणि राजेंद्र यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्या वादामध्ये राजेंद्र यांनी नागेंद्रला एक चापट मारली, नशेत असल्याची जाणीव करून देत त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले, असंही पोलिसांनी सांगितले. अर्ध्या तासानंतर नागेंद्र पुन्हा घटनास्थळी परतला आणि पुन्हा वाद घालण्याचा प्रयत्न करू लागला.

advertisement

वाद झाल्यामुळे राजेंद्र यांनी त्यांच्या पुतण्याला दुकान बंद करून घरी जायला सांगितले, दोघे निघत असताना, नागेंद्रने राजेंद्र बेसावध असताना त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतू त्यांना लायटरने पेटवून दिले. या प्रकरणामध्ये राजेंद्र गंभीर भाजले आहेत. उपस्थित नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत ब्लँकेट आणि गोणपाटाच्या साहाय्याने आग विझवली. दरम्यान, नागेंद्र घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी असलेल्या राजेंद्र यादव यांना शेजारी राहणाऱ्या मनोज यादव यांनी दुचाकीवरून प्रथम ट्रॉमा केअर आणि त्यानंतर मल्लिका हॉस्पिटल, जोगेश्वरी पश्चिम येथे दाखल केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक सणाला गोड जोड, पुण्यात मिळतंय चक्क तिळगुळ चॉकलेट, हे आहे लोकेशन
सर्व पहा

डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेप्रकरणी नागेंद्र याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप आहे. रुग्णालयातच पोलिसांनी राजेंद्र यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. राजेंद्र यांनी अंबोली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 109 (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी नागेंद्र यादव याला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याप्रमाणेच पोलीस पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime: 12 रुपयांच्या सिगारेटवरून वाद झाला अन् तरुणाने वाहनचालकाला पेटवलं, मुंबईतील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल