सध्या बाजारात तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गूळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र, मूर्ती बेकरीचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक चवीला आधुनिक चॉकलेटचा स्पर्श देत तयार करण्यात येणारे पदार्थ. मकर संक्रांतीनिमित्त येथे तिळगुळ चॉकलेट, तिळाचे चॉकलेट, आंबा वडी, तीळ वडी, श्रीखंड वडी, गूळ पोळी आणि पुरणपोळी असे विविध प्रकारचे गोड पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ गेली अनेक वर्ष सातत्याने बनवले जात असून ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे.
advertisement
तिळगुळ होणार नाहीत कडक, पाकात बनवा झटपट रेसिपी, संपूर्ण Video
विशेष म्हणजे तिळगुळ चॉकलेट हे उत्पादन पुणे शहरात इतरत्र कुठेही सहज उपलब्ध नसल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हे चॉकलेट विशेष भावते. पारंपरिक तिळगुळाची चव कायम ठेवत त्यात चॉकलेटचा अनोखा संगम साधण्यात आला असल्याने ग्राहक पुन्हा पुन्हा याची खरेदी करत आहेत.
याबाबत माहिती देताना विक्रम मूर्ती म्हणाले, विविध सणांनिमित्त आम्ही चॉकलेटचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. मकर संक्रांतीसाठी खास तिळगुळ चॉकलेट हे आमचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पारंपरिक पदार्थांची चव जपत त्यात नावीन्य आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच हे पदार्थ 70 रुपयांपासून उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मूर्ती बेकरीत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असून, परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधणारे हे गोड पदार्थ पुणेकरांच्या संक्रांतीचा आनंद अधिकच वाढवत आहेत.





