Pune: हद्द झाली! पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त, कुणाला वाटणार होते?

Last Updated:

भरारी पथकाने शहरातील रहाटणी परिसरात असलेल्या गणराज कॉलनी इथं १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत

News18
News18
पिंपरी : राज्यात २९ महापालिका निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावला आहे. एकीकडे अनेक ठिकाणी पैशांचं वाटप सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तब्बल १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या भरारी पथकाने शहरातील रहाटणी परिसरात असलेल्या गणराज कॉलनी इथं १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं? 
१२ जानेवारी रोजी रात्री १०.२३ वाजता आचारसंहिता कक्षाला रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफ.एस.टी. भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे एका गाडीमध्ये (क्र. एमएच १४ केए ६३३०) जवळपास १९ वॉशिंग मशीन असल्याचं आढळून आलं आहे. या वॉशिंग मशीन कुठून आल्या, कुणी मागवल्याा, कुणाच्या मालकीच्या आहेत. याचा शोध आता पोलीस घेत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: हद्द झाली! पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त, कुणाला वाटणार होते?
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement