प्रचार संपताच अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का, पक्षाच्या राजकीय सल्लागारावर क्राईम ब्रांचची धाड

Last Updated:

क्राईम ब्रान्चकडून डिझाईन बॉक्सच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची तपासणी करण्यत आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

News18
News18
पुणे : महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार संपताच पुण्यात मोठी घडामोड घडील आहे. अजित पवार यांच्यासाठी ‘गुलाबी कॅम्पेनिंग’ राबवणारे राजकीय रणनीतीकार आणि राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर क्राईम ब्रान्चकडून कारवाई करण्याच आली आहे. क्राईम ब्रान्चकडून डिझाईन बॉक्सच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची तपासणी करण्यत आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारवाई कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही कंपनी लोकसभा निवडणुकीपासून काम करत आहे. अजित पवारांच्या सभांचे नियोजन करणे, अजित पवारांची प्रतिमा जनमानसात कशी जावी यासाठी धोरण ही कंपनी आखण्याचे काम करत आहे. अजित पवारांच्या निवडणूक प्रक्रियेत या कंपनीचा मोठा वाटा आहे. या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रान्चने कारवाई केले आहे.

कारवाईचे कारण गुलदस्त्यात

advertisement
या कारवाई संदर्भात पुणे पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. नक्की ही कारवाई कशा संदरर्भात झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  प्रचार संपताच अवघ्या तासाभरात ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात अजित पवारांची भाजपच्या नेत्यांवर मोठी टीका

पुण्यात अजित पवारांनी प्रचार सभेत भाजपच्या नेत्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी खासदार मुरलीधर मोहळ, आमदार महेश लांडगे यांच्यावर वैयक्तिक देखील टीका केली होती.  त्यानंतर ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
advertisement

पोलीस माघारी फिरले

अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणाऱ्या नरेश अरोरांचा डिजाईन बॅाक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार आली म्हणून पोलिस गेले होते. मात्र तथ्य नसल्याने पोलिस माघारी फिरले,अशी माहिती समोर आली आहे.

कोण आहे नरेश अरोरा?

नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी design boxed.com चे सहसंस्थापक आहेत. त्यांनी राजस्थान, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं काम पाहिलं आहे. प्रचार व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे. लोकसभा निवडणुकांपासून ते अजित पवारांच्या पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनीतीची काम पाहतात. पक्षाचा नेता म्हणून अजित पवारांचं ब्रँडिंग करण्याचे काम देखील या कंपनीने केले आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या मेकओव्हरवरमध्ये या कंपनीचा मोठा हात होता.  डिजिटल मार्केटिंगचे ते मास्टर मानले जातात. पंजाब सरकारने ड्रग्सविरोधी लढ्यासाठी असलेल्या विशेष टास्क फोर्स (STF) चे डिजिटल मीडिया स्पेशालिस्ट आहेत. नरेश अरोरा यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. ते अमृतसरचे आहे. परंतु आता बंगळुरूमध्ये राहत आहेत. त्यांची कंपनी डिझाईन बॉक्स 10 वर्षांपासून निवडणूक व्यवस्थापन पाहत आहे
view comments
मराठी बातम्या/पुणे/
प्रचार संपताच अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का, पक्षाच्या राजकीय सल्लागारावर क्राईम ब्रांचची धाड
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement