या डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या विभागातील रस्त्यांचे काम कधी सुरू होणार कुठपर्यंत पोहोचले आहे आणि पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे याची माहिती मिळणार आहे. https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या संकेतस्थळावर विभागनिहाय व परिमंडळनिहाय कामांची सविस्तर माहिती पाहता येते.
जळगाव-सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 198पदांची भरती,जाणून घ्या पात्रता; असा करा अर्ज
advertisement
यामध्ये पूर्ण झालेली कामे सध्या सुरू असलेली कामे आणि अद्याप सुरू न झालेल्या रस्त्यांची यादी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर कोणत्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू होणार आहे आणि त्यासाठी किती कालावधी लागेल याचेही अंदाजित वेळापत्रक यावर पाहता येते. नागरिक विशिष्ट रस्त्याचे नाव टाकून शोध घेऊ शकतात किंवा नकाशावरून थेट क्लिक करून देखील माहिती मिळवू शकतात.
तसेच, मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mcgm.gov.in) ‘नागरिकांकरीता’ या विभागातील ‘Mega CC Road Works Progress’ या लिंकवरूनही काँक्रीटीकरण प्रकल्पाची सविस्तर माहिती मिळते.
सुप्रीम कोर्टात 67,700 पगाराची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची शेवटची संधी; कसा कराल अर्ज?
गेल्या काही महिन्यांत काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक ठिकाणी रस्ते एकाच वेळी खोदल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती आणि पादचाऱ्यांना देखील त्रास झाला होता. या पार्श्वभूमीवर विधानमंडळातही हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यामुळे पालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
या सर्व गोष्टींचा विचार करून पालिकेने यंदा कामांमध्ये पारदर्शकता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले की कामे दर्जेदार केली जातील आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल.