Supreme Court Recruitment 2025 : सुप्रीम कोर्टात 67,700 पगाराची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची शेवटची संधी; कसा कराल अर्ज?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Supreme Court Recruitment 2025 : भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मास्टर (शॉर्टहँड) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगल्या नोकरीची आणि पगाराची नितांत गरज आहे. तर एक संधी आहे, ज्या संधीचं तुम्ही सोनं करु शकता… आता अशातच भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मास्टर (शॉर्टहँड) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असल्यामुळे वेळ वाया न घालवता sci.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करणे आवश्यक आहे.
खूप कमी पदांसाठी ही भरती केली जात आहे. जेमतेम 30 पदांचाच भरतीमध्ये समावेश आहे. त्यापैकी 16 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जातीसाठी 4 जागा तर अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी 8 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अर्ज भरताना सर्वात आधी अर्जदारांनी जाहिरात व्यवस्थित वाचूनच अर्ज भरावा. अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. याशिवाय, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्द आणि कम्प्यूटर टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्दांचा वेग असणे आवश्यक आहे. अर्ज भरताना याचे प्रमाणपत्र आवश्यक आहेत.
advertisement
याशिवाय, अर्जदाराकडे अर्ज भरताना स्टेनोग्राफी किंवा सेक्रेटरी पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असल्याचा सर्टिफिकेटही अर्जदाराकडे असावे. एकूण शैक्षणिक पात्रता आणि उमेदवराचा अनुभव वैगेरे पाहता अर्जदाराचे वय 30 ते 45 वर्षांच्या मध्येच असलं पाहिजे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1500 रूपये आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दिव्यांग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या अवलंबितांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील. हे पेमेंट युको बँक पेमेंट गेटवे द्वारे करता येईल. अर्जाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं देखील सांगितलं जात आहे.
advertisement
अर्जाच्या अंतिम तारखेची माहिती उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवरून मिळेलच. अर्जाची शेवटची तारीख अनेकदा बदलली सुद्धा जाते. भरतीची निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वात आधी शॉर्टहँड टायपिंग टेस्ट होईल. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हची लेखी परीक्षा होईल. पुढच्या टप्प्यात संगणक टायपिंग स्पीड टेस्ट घेतली जाईल आणि शेवटी पात्र उमेदवारांची मुलाखत होणार आहे. या सर्व टप्प्यांमधून यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 11 अंतर्गत 67 हजार 700 रुपये सुरुवातीचं वेतन असेल. याशिवाय, सरकारी नियमांनुसार इतर भत्ते देखील दिले जातील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 7:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supreme Court Recruitment 2025 : सुप्रीम कोर्टात 67,700 पगाराची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची शेवटची संधी; कसा कराल अर्ज?