प्राणीप्रेमींना मोठा दिलासा, आता एकाचवेळी नेता येणार इतके प्राणी
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी कंपनीमध्ये फक्त 4 पदांसाठी नोकरभरती होणार आहे. स्टोअर सुपरिटेंडेंट, प्लेसमेंट ऑफिसर, आयटी असिस्टंट आणि अकाउंटंट या पदांसाठी प्रत्येकी एका जागेसाठी ही नोकरभरती केली जाणार आहे. फक्त 4 पदांसाठीच ही नोकरभरती होणार आहे. पदाप्रमाणेच शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहे. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, लॉजिस्टिक्स, कॉमर्स, एचआर, करिअर काऊन्सिलर, बायो टेक्नोलॉजी, बी.एससी, एम. एससी, कम्प्युटर सायन्स, आयटी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण कॉमर्स किंवा अकाऊंटमध्ये हवं. अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आहे.
advertisement
जेवणानंतर गूळ खाणं खरंच योग्य आहे का? पाहा गुळाचे फायदे आणि दुष्परिणाम..
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी व्यवस्थित जाहिरातीची PDF वाचावी. शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट वैगेरे पाहून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. recruitment.iocb@staff.ictmumbai.edu.in या इमेल आयडीवर मेल करून अर्ज करायचे आहे. जर अर्जदाराने अर्जामध्ये माहिती अपूर्ण ठेवली असेल, तर त्या अर्जदाराचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 18 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर असणार आहे. अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे नाहीये. शिवाय, वयोमर्यादा देखील ठरवून देण्यात आलेली नाही. स्टोअर सुपरिटेंडेंट, प्लेसमेंट ऑफिसर आणि अकाउंटंट या पदांसाठी 40,000 रूपये इतका पगार असणार आहे, तर आयटी असिस्टंट पदासाठी 30,000 रूपये इतका पगार असणार आहे.