TRENDING:

कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास 15 मिनिटांत, चाकरमान्यांना दिलासा; केव्हापासून प्रोजेक्टला होणार सुरूवात?

Last Updated:

कल्याण, डोंबिवली आणि ठाणेवरून नवी मुंबईला दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दैनंदिन होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी MMRDA कडून ऐरोली- कटाई एलिव्हेटेड रोड तयार केला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण आणि डोंबिवलीहून नवी मुंबईकरिता प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणेवरून नवी मुंबईला दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दैनंदिन होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी MMRDA कडून ऐरोली- कटाई एलिव्हेटेड रोड तयार केला जात आहे. यामुळे मुंबईसह उपनगरांतील चाकरमान्यांना वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. खरंतर, या एलिव्हेटेड मार्गाचं काम आतापर्यंत बऱ्यापैकी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. एलिव्हेटेड मार्ग पूर्ण झाल्यानंतर कल्याण- डोंबिवलीकरांना 15 मिनिटांतच नवी मुंबई गाठता येणार आहे.
कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, चाकरमान्यांना मोठा दिलासा; केव्हापासून प्रोजेक्टला होणार सुरूवात?
कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, चाकरमान्यांना मोठा दिलासा; केव्हापासून प्रोजेक्टला होणार सुरूवात?
advertisement

ऐरोली- कटाई एलिव्हेटेड रोडमुळे कल्याण, डोंबिवली आणि ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. सध्या नवी मुंबई ते कल्याण किंवा डोंबिवलीला पोहोचण्यासाठी बाय रोड दीड तासांचा अवधी लागतो आणि जर तुम्ही ट्रान्स हार्बर रेल्वेने गेलात कल्याण- डोंबिवली- ठाणे आणि ठाणे- तुर्भे- नेरूळ- पनवेल अशा मार्गे प्रवाशांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. या नव्या एलिव्हेटेड मार्गामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होणार आहे. बाय रोड आणि रेल्वे मार्गे लागणाऱ्या वेळेची आता मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. गर्दीवर तोडगा काढण्यासाठी ऐरोली- कटाई नाका उन्नत रस्ता सुरू करण्यात आलाय. हा रस्ता सुरू झाल्यास दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

advertisement

ऐरोली- मुंब्रा प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी MMRDA ने मुंब्रा- कटाई नाका उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. हा मार्ग देसाई खाडीतून जात आहे. कनेक्टिव्हिटीसाठी पारसिक टेकड्यांमधून एक भूमिगत बोगदा बांधण्यात आलाय. 2018 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. एलिव्हेटेड रोडच्या पहिल्या टप्प्यात ठाणे- बेलापूर रोड ते एनएच 4 पर्यंत 3.48 किमी लांबीच्या आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे- बेलापूर मार्गावरील ऐरोली पुलापासून जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. 6.71 किमी लांबीचा हा रस्ता देसाई खाडी ओलांडेल. 2026 वर्षाच्या शेवटपर्यंत हा रस्ता सर्वांसाठी खुला होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. या रस्त्यामुळे चाकरमान्यांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमची सुटका होणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहान मुलांसाठी क्युट बॅग्स, 100 रुपयांत करा खरेदी,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

पारसिक टेकड्यांमधील बोगद्यांतून जाणारा हा रस्ता चार लेनचा असल्याने डोंबिवलीजवळील ऐरोली ते कटाई नाका दरम्यानचा प्रवास अधिक जलद होणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐरोली परिसरातून जाणाऱ्या अवजड वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल. मुंबई- कल्याण आणि कल्याण- मुंबई दरम्यान ये- जा करणारी वाहने थेट या एलिव्हेटेड मार्गाचा वापर करू शकतील. परिणामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास 15 मिनिटांत, चाकरमान्यांना दिलासा; केव्हापासून प्रोजेक्टला होणार सुरूवात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल