या ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या प्रस्थानवेळेत विलंब होणार आहे. मडगाव–मुंबई CSMT एक्स्प्रेस (20112) ही गाडी 30 मिनिटे उशिरा सुटेल. तिरुवनंतपुरम नॉर्थ–एलटीटी एक्स्प्रेस 60 मिनिटे उशिरा धावेल, तर मंगळुरू–मुंबई CSMT एक्स्प्रेस 50 मिनिटे उशिरा धावणार आहे. तळोजा पाचनंद येथे सुरू असलेल्या क्रॉसओव्हर कमिशनिंगमुळे सिग्नल आणि मार्गरचना सुधारण्यासाठी ही वेळ आवश्यक असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
advertisement
Mumbai Metro: मुंबई मेट्रोबद्दल मोठी बातमी, Metroच्या वेळापत्रकात बदल, या स्थानकांवर होणार परिणाम
यानंतर 14 डिसेंबरला सुटणारी मडगाव–मुंबई CSMT एक्स्प्रेस (20112) पुन्हा एकदा 60 मिनिटांनी नियंत्रित करण्यात येणार आहे. तसेच 15 डिसेंबर रोजी सुटणारी मुंबई CSMT–मडगाव एक्स्प्रेस (10103) ही गाडी 30 मिनिटांनी उशिराने रवाना होईल. सध्या सुरू असलेल्या कामामुळे मार्गावरील गाड्यांची क्रॉसिंग क्षमता आणि वाहतूक सुरळीतता वाढणार आहे. त्यामुळे हा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या दिवसांमध्ये प्रवास करणार असल्यास वेळापत्रकातील बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी स्टेशनवर वेळेआधी पोहोचून गाडीची सुधारित वेळ तपासावी जेणेकरून गैरसोय होणार नाही. तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेची गती, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.






