नेमकं काय घडलं?
प्रियंका महापे एमआयडीसीतील एका कंपनीत काम करते. 26 डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती परंतु सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही त्यामुळे कुटुंबातील सर्वजण चिंतेत आहेत.
घरच्यांनी सुरुवातीला स्वतः शोध घेतला, पण काही ठावठिकाणा लागला नाही. तिच्या कंपनीतील सहकारी, मित्र-मैत्रिणीकडे चौकशी करूनही प्रियंकाचा काहीही पत्ता लागलेला नाही. प्रियंका अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबात भीती आणि चिंता पसरली आहे. सर्व ठिकाणी तिचा शोध घेतला जात आहे पण अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
advertisement
शेवटी तिच्या मोठ्या बहिणीने तुर्भे पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला असून प्रियंकाच्या शेवटच्या हालचाली, संपर्कातील लोक आणि तिच्या फोन कॉल्सची चौकशी सुरू आहे. तपास सध्या गुप्त ठेवण्यात आला असून कुणालाही माहिती असल्यास लगेच पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. प्रियंका बेपत्ता झाल्याचे प्रकरण तातडीने सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
