मक्याच्या आवकेत घट
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 320 क्विंटल मक्याची आवक झाली. छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या मक्यास प्रतीनुसार कमीत कमी 1600 ते जास्तीत जास्त 1750 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, सोमवारी अवकाळी संकट, कुठं कोसळणार पाऊस?
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 29 हजार 713 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 16 हजार 411 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 1000 ते 2000 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 8994 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1600 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 463 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 300 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4400 ते 4900 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.





