TRENDING:

IRCTC Down : रेल्वेचं तिकीट बुक करताय अन् ऑनलाईन पेमेंट अडकलं, रिफंडसाठी लगेच फॉलो करा ही पद्धत

Last Updated:

How To Get Refund If IRCTC Payment : आयआरसीटीसीची वेबसाइट आणि ॲप डाऊन झाल्याने हजारो प्रवाशांचे तिकीट बुकिंग आणि पेमेंट अडकले. मात्र काळजी नको. आयआरसीटीसीच्या ऑटोमॅटिक रिफंड प्रक्रियेद्वारे पैसे 3 ते 5 दिवसांत तुमच्या खात्यात जमा होतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ऐन दिवाळीचा सण सुरू असल्याने अनेक नागरिक गावी जाण्यासाठी रेल्वे तिकिट बुक करत आहेत. त्यातही आयआरसीटीसीच्या या अॅपच्या माध्यमातून ज्यात तिकीट बुकिंग करत असतात. पण या गर्दीच्या काळात आयआरसीटीसीची वेबसाइट आणि मोबाईल ॲप काही तास ठप्प पडल्याने हजारो प्रवाशांना मोठा धक्का बसला.
News18
News18
advertisement

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या सेवेत अचानक अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांना लॉगिन करता येत नव्हते आणि सतत Server Unavailableअसा प्रवाशांना मेसेज दिसत होता. सोशल मीडियावर अनेकांनी या समस्येबद्दल तक्रारी नोंदवल्या, तर Down Detector वर 5,000 हून अधिक लोकांनी वेबसाइट ठप्प असल्याचे सांगितले.

काही तासांनंतर वेबसाइट आणि ॲप पुन्हा सुरू झाले असले तरी अजूनही काही युजर्सना तिकीट बुक करताना अडचणी येत आहेत. या अडचणींमुळे अनेकांचे पैसे मध्येच अडकले आहेत. मात्र आता प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाही कारण आयआरसीटीसी अशा सर्व प्रकरणांमध्ये पैसे आपोआप परत करते.

advertisement

IRCTC ठप्प होण्याचे संभाव्य कारण काय?

आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा ॲप डाऊन होण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे सर्व्हरवरचा ताण. दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात लाखो प्रवासी एकाच वेळी तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लॉगिन करण्याचा प्रयत्न करतात. या अचानक वाढलेल्या ट्रॅफिकमुळे सर्व्हर क्रॅश होतो आणि वेबसाइट काही काळासाठी काम करणे थांबवते.

पैसे अडकले असतील तर काळजी करू नका – असे मिळवा परत!

advertisement

तिकीट बुकिंगदरम्यान पेमेंट झाले पण तिकीट बुक झाले नाही, तर आयआरसीटीसी तुमचे पैसे परत देते. हे रिफंड पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीने केले जाते.

1)ऑटोमॅटिक रिफंड प्रक्रिया: पेमेंट फेल झाल्यानंतर 3 ते 5 वर्किंग डेज मध्ये पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात.

2)जास्तीत जास्त कालावधी: काही वेळा तांत्रिक कारणांमुळे रिफंड 21 दिवसांपर्यंत लागू शकतो.

advertisement

रिफंड वेळेत न मिळाल्यास काय कराल?

1)जर निश्चित कालावधीनंतरही तुमचे पैसे परत आले नाहीत, तर तुम्ही IRCTC शी थेट संपर्क साधू शकता.

2)स्क्रीनशॉट घ्या: ट्रांझेक्शन फेल झाल्यावर लगेच त्याचा स्क्रीनशॉट सेव्ह करा.

3)ईमेल करा: care@irctc.co.in या अधिकृत ईमेल आयडीवर स्क्रीनशॉटसह ईमेल पाठवा.

4)कस्टमर केअर नंबर: तुम्ही IRCTC च्या हेल्पलाइनवरही संपर्क करू शकता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

आयआरसीटीसी  दररोज लाखो प्रवाशांची तिकिटे बुक करतात, त्यामुळे सणासुदीच्या काळात तांत्रिक ताण येणे अपरिहार्य ठरते. मात्र, आयआरसीटीसीची रिफंड प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक आहे. त्यामुळे तुमचे पैसे अडकले असतील तरी घाबरू नका ते निश्चितच तुमच्या खात्यात परत येतील.

मराठी बातम्या/मुंबई/
IRCTC Down : रेल्वेचं तिकीट बुक करताय अन् ऑनलाईन पेमेंट अडकलं, रिफंडसाठी लगेच फॉलो करा ही पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल