अटल सेतूवर आता टोलचे टेन्शन मिटले
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा अटल बिहारी वाजपेयी अटल सेतूवरील पथकरात आधी दिलेली 50 टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. सध्या दररोज सुमारे 60 हजार वाहने या पुलावरून ये-जा करतात.
कधीपर्यंत टोल फ्री प्रवास करता येणार?
1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत वाहनचालकांना अटल सेतूवरून सवलतीच्या दरात किंवा काही वाहनांना पूर्णपणे टोल फ्री प्रवास करता येणार आहे.
advertisement
अटल सेतूवरून ई-वाहने आणि बसेस टोल फ्री प्रवास करणार
सरकारने इलेक्ट्रिक मोटार कार आणि बसेसना अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याचाही निर्णय घेतला आहे. ही तरतूद अधिकृत अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ई-वाहनधारकांसह इतर वाहनचालकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी 4 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अटल सेतूवरील पथकरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच निर्णयानुसार आता पुढील वर्षासाठीही पथकर आकारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे पथकर दर निश्चित करण्यात आले आहेत. मोटार, जीप, व्हॅन, हलकी आणि जड वाहने, बस, ट्रक तसेच अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी वेगवेगळे दर ठरवण्यात आले असून वाहनाच्या प्रकारानुसार पथकर आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे अटल सेतूचा वापर अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर ठरणार आहे
