'असा' असेल बदल
18 डब्यांच्या एसी लोकलमध्ये तीन-फेज प्रोपल्शन सिस्टीम असणार आहे. चाचणीदरम्यान ट्रेनची आपत्कालीन ब्रेकिंग क्षमता, कप्लर फोर्स, सुरक्षितता आणि एकूण कामगिरी यासारख्या महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, बॉम्बार्डियर कंपनीने तयार केलेल्या रॅकची चाचणी ताशी 110 किमी वेगाने होणार असून मेधा इलेक्ट्रिक्सने बनवलेल्या रॅकची चाचणी ताशी 105किमी वेगाने घेण्यात येणार आहे. चाचणीपूर्वी सर्व डबे आवश्यक अपग्रेडेशन करून सज्ज केले जाणार आहेत.
advertisement
सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये 12 आणि काही ठिकाणी 15 डब्यांच्या लोकल धावत आहेत. मात्र भविष्यात वाढणारी प्रवासी गर्दी आणि सुरू असलेली पायाभूत कामे लक्षात घेता 18 डब्यांच्या लोकलचा पर्याय विचारात घेतला जात आहे. यामध्ये एसी लोकलचाही समावेश असेल.
कधी सुरु होणार 18 डब्ब्यांची एसी लोकल
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही चाचणी पूर्णपणे प्रायोगिक असून सध्या लगेच 18 डब्यांची एसी लोकल सुरू केली जाणार नाही. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत सुमारे 21 हजार कोटी रुपये खर्चून 2,856 कोच खरेदी करण्याची योजना आहे. भविष्यात पायाभूत सुविधा सक्षम झाल्यानंतर 15 किंवा 18 डब्यांची एसी लोकल सुरु होईल.
