मिळालेल्या माहितीनुसार,सध्या ही आग मुंबईच्या धारावी-माहीम दरम्यान रेल्वे ट्रॅक जवळ लागलेली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. शिवाय अग्निशमन दलाचे जवान प्रचंड शर्तीचे प्रयत्न करत आहेत. तरीसुद्धा वाऱ्याच्या वेगामुळे आग अधिक वेगाने पसरत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जणांनी आपल्या घरातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणाले की, ''सध्या ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून आम्ही प्रत्येक शक्यतो मार्ग वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, ही परिस्थिती गंभीर आहे आणि नागरिकांनी परिसरातून लांब राहावे.'' जवळपासच्या रस्त्यांवर वाहतूकही ठप्प झाली असून पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना देखील दिलेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे काही लोक आग पाहण्यासाठी घटनास्थळी जमले आहेत
विशेष म्हणजे ही लागलेली आग फक्त त्या परिसरापूर्ती मर्यादित न राहता जवळपासच्या परिसरातही पसरण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाने अतिरिक्त गाड्या मागवल्या आहेत आणि हवेतूनही ड्रोनद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे
