कोकणवासीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची डेडलाईन सरकारने वाढवली, काय आहे तारीख?
गेल्या अनेक काळापासून प्रवासी कल्याणमध्ये मीटर तत्वावर रिक्षा चालवण्याची मागणी करीत आहे. अखेर आता त्यांच्या मागणीला यश मिळालं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे, आजपासून (२५ ऑगस्ट) कल्याणमध्ये मीटर रिक्षा चालवली जाणार आहे. शुक्रवारी (२२ ऑगस्ट) पेणकर यांच्यासोबत वाहतूक पोलिस, आरटीओ, रेल्वे अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मीटर रिक्षासाठी स्टँड निश्चित केला.
advertisement
उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षा या स्टँडवरूनच मीटर रिक्षा चालवल्या जाणार आहेत. कल्याण - डोंबिवली शहरांत रिक्षा चालकांकडून मीटर रिक्षापेक्षा शेअर रिक्षा आणि थेट रिक्षा असा पर्याय देत प्रवाशांना वेठीस धरले जाते. उच्च न्यायालयाने शहरात मीटर रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतरही रिक्षाचालक शहरात मीटर रिक्षा मिळणारच नाहीत, यासारखे उर्मट उत्तरे प्रवाशांना देतात. यामुळे शहरात मीटर रिक्षा कधी धावणार असा प्रश्न प्रवाशांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता.
रेल्वेकडून कोकणवासीयांना बंपर गिफ्ट! आता प्रवास होणार आणखी सुखकर आणि आरामदायी, नेमकं कारण काय?
अखेर आरटीओ आणि रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यानी पुन्हा एकदा मीटर रिक्षाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा संघटनेच्या अध्यक्षांनी पुढाकार घेत आरटीओ, शहर पोलिस, वाहतूक पोलिस आणि रेल्वे अधिकारी यांच्यासोबत मीटर रिक्षा स्टँडची जागा निश्चित केली. यापूर्वीही कल्याणमध्ये, मीटर रिक्षा आणि प्रीपेड रिक्षा सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र प्रवाशांकडून दिलासादायक प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद करावी लागल्याची प्रतिक्रिया रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. शहरामध्ये आता तरी मीटर सेवा सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मागणीप्रमाणेच मीटरप्रमाणे रिक्षा उपलब्ध केल्या जाणार आहेत. नागरिकांना या सेवेला प्रतिसाद द्यावा तसेच रिक्षा चालकांनी नकार दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
