Mumbai Goa Highway Deadline: कोकणवासीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची डेडलाईन सरकारने वाढवली, काय आहे तारीख?
Last Updated:
कोकणवासीय आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात आहे. मुंबई आणि ठाणे शहरातून जाणाऱ्या कोकणवासीयांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, ती एक प्रकारे त्यांच्यासाठी डोकेदुखीच ठरली आहे.
मुंबई गोवा महामार्गाची गेल्या सतरा वर्षांपासूनची अर्धवट स्थिती आणि खड्ड्यांची समस्या कोकणवासीयांसाठी कायम आहे. हा महामार्ग NH- 66 म्हणून ओळखला जातो. रस्त्यांच्या अपूऱ्या कामांमुळे आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे वाहनांच्या वेगमर्यादेमध्ये मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावा लागत आहे. या अशा समस्येमुळे महामार्गावर रस्ते अपघात होताना दिसतात. 22 ऑगस्टपासून कोकणवासीय आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जाताना दिसत आहे. मुंबई आणि ठाणे शहरातून जाणाऱ्या कोकणवासीयांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, ती एक प्रकारे त्यांच्यासाठी डोकेदुखीच ठरली आहे.
अपूर्ण मुंबई- गोवा महामार्गामुळे कोकणवासीय गेल्या १७ वर्षांपासून कमालीचे चिंतेत आहे. तो त्यांच्यासाठी चिंतेचं कारण ठरलं आहे. रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे वाहनांची वेगमर्यादा मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि वाहनचालक करतात. "रायगड जिल्ह्यातील पेण आणि माणगाव तालुक्यांमध्ये सात वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असून इंधनाचाही जास्त वापर होतोय. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होताना दिसत आहे. शिवाय, मुख्य बाब म्हणजे रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. " अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी दिलीय.
advertisement
सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील अनेक भागांतील काम पूर्ण झालं आहे. रायगडमधील आणि रत्नागिरीतील ७३% ते ८६% काम पूर्ण झाले आहे. कामाच्या दिरंगाईमुळे अधिकारी आणि राजकीय नेत्यांना कोकणवासीयांसाठी रेल्वे तिकिटामध्ये आणि बस प्रवासामध्ये सूट आणि इतर मदत देणे भाग पडले आहे. शिवाय खासगी वाहनांनाही टोलमध्ये सूट द्यावी लागत आहे. ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग (PWD-NH) विभागाकडून केली जातात. NHAI पनवेल ते रायगड जिल्ह्यातील इंदापूर पर्यंतचा ८४.६ किमी लांबीचा रस्ता ४८३ कोटी रुपयांच्या खर्चाने बांधत आहे, तर PWD-NH विभाग ३६६ किमी लांबीचा रस्ता - विस्तारासह - ६,१०० कोटी रुपयांच्या एकत्रित खर्चाने बांधत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील पनवेल-इंदापूर या भागातील राष्ट्रीय महामार्गाचे काम ८६% पूर्ण झाले आहे. पनवेल-कासू आणि कासू-इंदापूर या मार्गावर दोन भागात काँक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. पीडब्ल्यूडी-एनएचच्या आकडेवारीनुसार इंदापूर-वडपाले मार्गाचे (२७ किमी) काम ७३% पूर्ण झाले आहे, तर उर्वरित मार्ग रायगडमध्ये जवळजवळ पूर्ण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमधील अरवली- कांटे मार्ग (३९ किमी) ८१% आणि कांटे-वाकडे (४९ किमी) ८६% पूर्ण झाला आहे, परंतु परशुराम घाट-आरवली (३४ किमी) विभागावरील चिपळूण उड्डाणपुलाचा भाग फक्त शिल्लक आहे. त्याचे एकूण काम ९३% आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचे आणि महामार्ग दुरुस्तीचे काम २४ तास आठवड्याचे ७ ही दिवस सुरू ठेवले आहे.
advertisement
राज्य सरकारने मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च २०२६ पर्यंत वाढवली आहे. तितक्या वेळेत तरी हा महामार्ग पूर्ण होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मार्च २०२६पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे, तर कदाचित कोकणवासीयांचा शिमगाला जाण्याचा मार्ग अधिकच सुखकर होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 4:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Goa Highway Deadline: कोकणवासीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची डेडलाईन सरकारने वाढवली, काय आहे तारीख?


