TRENDING:

MHADA Lottery: नव्या वर्षात मिळणार स्वस्तातलं घर, म्हाडाची बंपर लॉटरी, सोडत कधी? संपूर्ण माहिती

Last Updated:

MHADA Lottery 2026: मुंबई मंडळाने 2025 मध्ये सोडत काढण्याची घोषणा केली होती. मात्र मार्च–एप्रिलचा मुहूर्त टळला आणि नंतर दिवाळीपर्यंतही सोडत झाली नाही. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने 2025 मध्ये सोडत काढणे शक्य झाले नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने 2026 च्या सुरुवातीला घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला सोडत जाहीर होण्याची शक्यता असून नव्या वर्षात तब्बल 2 हजारांहून अधिक घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते.
2026 मध्ये म्हाडा कोकण मंडळाची मोठी सोडत ; 2 हजारांहून अधिक घरांसाठी तयारी सुरू
2026 मध्ये म्हाडा कोकण मंडळाची मोठी सोडत ; 2 हजारांहून अधिक घरांसाठी तयारी सुरू
advertisement

आचारसंहिता संपल्यानंतरच सोडतीची घोषणा

कोकण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सोडतीबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सध्याच्या नियोजनानुसार फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च 2026 च्या सुरुवातीला सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.

Central Railway: एक महिना आधीच गेला ‘तो’ मेसेज, मध्य रेल्वेवर गोंधळ, प्रवाशी हैराण, नेमकं घडलं काय?

advertisement

2  हजारांहून अधिक घरांचा समावेश होण्याची शक्यता

या प्रस्तावित सोडतीत 2 हजारांहून अधिक घरांचा समावेश करण्याचे नियोजन कोकण मंडळाकडून करण्यात येत आहे. यासाठी विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील उपलब्ध घरांचा आढावा घेतला जात असून कोणती घरे सोडतीत टाकता येतील, याची तपासणी सुरू आहे.

काही योजनांना कमी प्रतिसाद, घरं रिक्त

कोकण मंडळाच्या 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र मंडळाच्या इतर गृहनिर्माण योजना तसेच पंतप्रधान आवास योजनेतील काही घरांकडे इच्छुकांचा फारसा कल दिसून येत नाही. घरांचे स्थान, किंमत आणि इतर कारणांमुळे ही घरे रिक्त राहतात.

advertisement

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेची विक्रीही रखडली

मागील दोनपेक्षा अधिक सोडतींमध्ये न विकली गेलेली घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेतून विक्रीस काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या अंतर्गत सुमारे 125  घरांची विक्री दिवाळीत करण्याचे नियोजन होते. मात्र आवश्यक कामे पूर्ण न झाल्याने दिवाळीचा मुहूर्त हुकला. त्यानंतर डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही घरविक्रीही लांबणीवर पडली. आचारसंहिता संपल्यानंतर ही विक्री प्रक्रिया सुरू होईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

advertisement

मुंबई मंडळाची सोडतही आचारसंहितेमुळे रखडलेली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कचऱ्यात मिळालं सोनं, पण कचरा वेचक महिलेची ती कृती, Video पाहून कराल कौतुक
सर्व पहा

मुंबई मंडळाने 2025 मध्ये सोडत काढण्याची घोषणा केली होती. मात्र मार्च–एप्रिलचा मुहूर्त टळला आणि नंतर दिवाळीपर्यंतही सोडत झाली नाही. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने 2025 मध्ये सोडत काढणे शक्य झाले नाही. आता मार्च 2026 मध्ये मुंबईतील घरांसाठी सोडत काढली जाईल, असे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी जाहीर केले असले तरी प्रत्यक्ष तयारी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच पुढील हालचाली स्पष्ट होतील.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery: नव्या वर्षात मिळणार स्वस्तातलं घर, म्हाडाची बंपर लॉटरी, सोडत कधी? संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल